शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"पुढील काळात आपण भाऊ म्हणून काम करू", फडणवीसांचा शब्द, भिमालेंचा बंड अखेर थंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 15:07 IST

पुढील काळात मला भाजप आणि महायुती सरकारमध्ये न्याय मिळेल याची खात्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांनी दिली

पुणे : पुण्यात पर्वती विधानसभेच्या उमेदवारीबाबत रस्सीखेच दिसून आली होती. पर्वती विधानसभा मतदार संघातून आमदार माधुरी मिसाळ इच्छुक असताना माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मिसाळ यांच्या विरोधात दंड थोपटले होते. मी ‘लढणार आणि जिंकणारच’ असा नारा त्यांनी दिला होता. परंतु या मतदारसंघातून मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर नाराज श्रीनाथ भिमाले यांनी २ दिवसात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. भिमाले बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांचे बंड थंड झाले असून महायुतीचे सरकार आणण्यासाठी लढणार आणि जिंकणार असा नारा देत पक्षाच्या कमाला सुरुवात केली आहे.

भिमाले म्हणाले,  मागच्या ४ दिवसापूर्वी मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. नंतर त्यांची माझी भेटही झाली. त्यांनी सांगितलं की, आपल्याला महायुतीचे काम करायचंय सरकार आणायचं आहे. पुढील काळात आपण भाऊ म्हणून काम करू.  तुम्ही महायुतीच्या जागा आणण्यासाठी प्रयत्न करा. आपल्याला ८ उमेदवार निवडून आणायचे आहेत. मी २७ वर्षे काम करतोय. सर्व नेते देवेंद्रजी, मुरलीधर मोहोळ सोबत आहेत. राज्यात देवेंद्रजींचे हात मजबूत करण्यासाठी महायुती आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी सांगितलं. लहान भाऊ म्हणून मला शब्द दिला. की मी तुझ्यासोबत आहे. त्यामुळे मी पुढं जाऊन अशी भूमिका करायला नको असं कार्यकर्त्यांना सांगितलं. आता ८ आमदार निवडून आणायचे काम करणार आहोत. आम्ही कुठलंही बंड  करणार नव्हतो. भारतीय जनता पार्टी मध्ये मला न्याय मिळेल याची खात्री देवेंद्र आणि मुरली भाऊंनी दिली. मी कुठलाही अपक्ष फॉर्म भरणार नाही. मी फक्त भाजपच काम करत राहणार आहे. आता महायुतीचे सरकार आणण्यासाठी लढणार आणि जिंकणार. महायुती आणि भाजपसाठी काम करत राहणार.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shrinath Bhimaleश्रीनाथ भिमालेparvati-acपर्वतीBJPभाजपा