शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Pune: वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आता सायबरचे दाेन विभाग

By भाग्यश्री गिलडा | Updated: June 27, 2023 16:12 IST

वाढत्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता सायबर गुन्हयांचा तपास किचकट असल्याने ते उघडकीस येण्याचे प्रमाण घटले आहे...

पुणे : वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्शवभूमीवर पुण्यात सायबरचे दोन विभाग करण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग करून सायबर गुन्ह्यांची विभागणी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

वाढत्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता सायबर गुन्हयांचा तपास किचकट असल्याने ते उघडकीस येण्याचे प्रमाण घटले आहे. सायबर पाेलीस ठाण्यात सध्या फक्त ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा शाेध घेतांना पाेलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून पुणे पाेलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सायबर पाेलीस ठाण्याचे पूर्व व पश्चिम असे दाेन विभाग करुन सायबर गुन्हयांचे तपासाचे विक्रेंद्रीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

अशी असेल रचनापुणे पाेलीसांचे पश्चिम विभागात परिमंडळ एक, दाेन व तीनचा समावेश असून त्यामध्ये फरासखाना विभाग, विश्रामबाग विभाग, स्वारगेट विभाग, लष्कर विभाग, काेथरुड विभाग व सिंहगड राेड विभागाचा समावेश आहे. यामध्ये एकूण १८ पाेलीस ठाण्यांचा समावेश असून सदर पाेलीस ठाण्यात यापुढे घडणाऱ्या सायबर गुन्हयांचा तपास पश्चिम विभागाचे सायबर पथक करणार आहे. त्यासाठी एका वरिेष्ठ पाेलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर पश्चिम विभागासाठीसुद्धा एका स्वतंत्र वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. दोन्ही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती होणार असून कामाच्या जबाबदारीचे विभाजन करण्यात येणार आहे. पूर्व भागात परिमंडळ चार व परिमंडळ पाचचा समावेश असून त्यामध्ये खडकी, येरवडा, हडपसर आणि वानवडी या विभागाचा समावेश असून त्यात एकूण १४ पाेलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सायबर चाेरटे वेगवेगळया प्रकारचे अमिष दाखवून नागरिकांना काेटयावधी रुपयांचा गंडा घालत असल्याचे दिसून येत आहे. सायबर चाेरटे हे प्रामुख्याने परराज्यातून गुन्हे करत असल्याने तसेच वेगवेगळया बँक खात्याचा, माेबाईल क्रमांकाचा, साेशल मिडिया माध्यमांचा वापर करत असल्याने तपास गुंतागुंतीचा हाेऊन त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे असते. अशावेळी अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपास करताना मर्यादा येतात. त्यामुळे पाेलीसांनी प्रत्येक पाेलीस ठाण्याचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना सायबर गुन्हे तपासाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पुणे शहरातील सायबर गुन्हेगारीच्या तक्रारी

- सन २०२१ - १९०२३- सन २०२२ - १९४०८- सन २०२३ - ६५००

शहरात वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सायबर पाेलीस ठाण्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपासात येणाऱ्या अडचणींना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व विभाग व पश्चिम विभाग असे सायबर पाेलीस ठाण्याचे स्वतंत्र विभाग हाेऊन तपासाची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. नागरिकांचे दृष्टीनेही अशाप्रकारे कामाचे विक्रेंद्रीकरण फायदेशीर आहे.

- रितेश कुमार, पाेलीस आयुक्त पुणे शहर

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcyber crimeसायबर क्राइम