शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

Pune | नासाच्या नावाने शेकडो लोकांना घातला ६ कोटींना गंडा; शंभरहून अधिक लोकांच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 12:42 PM

जवळपास १०० जणांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत...

पुणे : तांदुळ स्वत:कडे खेचून घेणारे धातूचे भांडे असून त्याचे परिक्षण नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था करणार आहे. त्यांच्या प्रतिनिधींना भारतात आणून त्यांचे संशोधनाच्या अहवालासाठी मोठा खर्च येतो, या धातूच्या भांड्याच्या विक्रीतून मोठा फायदा मिळू शकतो,असे सांगून सर्वसामान्यांना गंडविण्याचा प्रकार पुण्यातही सुरु असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी जवळपास १०० जणांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. 

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राम गायकवाड (रा. माळवाड, अकलुज, सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ (रा. कारखेल, पुणे) आणि राहुल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाबासाहेब रामहरी सोनवणे (वय ५०, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.  राईस पुलर या नावाने देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फसवणूकीचे प्रकार आजवर उघडकीस आले आहेत़.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करुन राईस पुलर धातूचे भांडे आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी  साधु वासवानी चौकाजवळील हॉटेल रिट्टस येथे लोकांचा मेळावा घेतला होता. यामध्ये तुम्ही गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल, असे सांगितले़ त्यांना बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केला. त्यानंतर या लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतले. गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने याची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. यात आतापर्यंत १००हून अधिक लोकांचे तक्रार अर्ज आले असून ही रक्कम ५ ते ६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रुईकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीNASAनासा