शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात ब्रम्हांड निर्मितीचे कोडे उलगडू शकते; पुण्याच्या जीएमआरटीचा मोठा वाटा

By श्रीकिशन काळे | Updated: June 29, 2023 16:18 IST

गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व टिपण्यासाठी भारत, जपान आणि युरोपमधील खगोलशास्त्रज्ञांच्या आतंरराष्ट्रीय पथकाने काम केले

पुणे: पुढील काही वर्षांत सर्व आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ एकत्र येऊन शंभरहून अधिक पल्सारचे (स्पंदन) निरीक्षण करणार आहेत आणि या गुरुत्व लहरींचा अभ्यास करून ब्रह्मांड तयार होताना अगदी सुरुवातीच्या काळतील घडामोडींचा अभ्यास करणार आहेत. आता गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व दिसून आले आहे. त्यामुळे यावर अधिक अभ्यास करून ब्रम्हांड निर्मितीचे कोडे उलगडण्याची शक्यता आहे. त्यासाठी हे संशोधन अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

या विषयाची माहिती गुरूवारी जीएमआरटीचे केंद्र संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर शास्त्रज्ञांनी गुरुवारी (दि. २९) पहाटे साडेपाच वाजता याविषयीची माहिती जाहीर केली. तसेच पुण्यात राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने (एनसीआरए) पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.  या वेळी टीआयएफआर प्रा. ए. गोपाकुमार, आयआयटी, हैदराबाद येथील प्रो. शंतनू देसाई,  डॉ. भालचंद्र जोशी. डा. जे. के. सोळंकी, मयुरेश सुरनीस आदी उपस्थित होते.

हा गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व टिपण्यासाठी भारत, जपान आणि युरोपमधील खगोलशास्त्रज्ञांच्या आतंरराष्ट्रीय पथकाने काम केले. त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका पुणे जिल्ह्यात असलेल्या खोडदच्या जीएमआरटी या महाकाय रेडिओ दुर्बिणीची आहे. आकाशगंगांच्या केंद्रांमध्ये महाकाय कृष्णविवरे असतात, या संशोधनाला २०२० चे खगोलशास्त्राचे नोबेल पारितोषक मिळाले होते. जेव्हा आकाशगंगा एकमेकांमध्ये विलीन होतात, तेव्हा त्यांच्या केंद्रांमधील कृष्णविवरेदेखील एकमेकांत विलीन होतात. ब्रह्मांडात सर्वत्र आणि सर्व दिशांना अशा विलीनीकरणाच्या घटना घडत असतात. त्यामुळे गुरुत्वीय लहरी ही सर्व दिशांनी तयार होतात. या लहरींच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आहे.  

एनसीआरएचे व जीएमआरटीचे केंद्र संचालक प्रा. यशवंत गुप्ता म्हणाले “आमच्या वैशिष्ट्यपूर्ण जीएमआरटी नोंदीचा वापर गुरुत्वीय लहरी खगोलशास्त्रावर चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी होताना पाहणे विलक्षण आहे. २०१३-२०१९ दरम्यान आम्ही जीएमआरटीमध्ये केलेल्या सुधारणांमुळे पल्सरच्या अचूक वेळा नोंदवणे हे एक महत्त्वाचे वैज्ञानिक लक्ष्य होते. पहिल्या काही वर्षांत याला फळ येत असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला. आम्ही जीएमआरटीसाठी तयार केलेल्या वाइडबँड रिसीव्हर सिस्टीममुळे उच्चप्रतीच्या नोंदी ठेवणे शक्य झाले.

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञानEarthपृथ्वीSocialसामाजिकenvironmentपर्यावरण