शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भाजपने नदी स्वच्छतेचे बॅनर तर लावले; पण कामाला सुरुवात झाली का? सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:41 IST

भाजपने पुनरुज्जीवन नदीचे समृद्धीकरण शहराचे असे बॅनर संपूर्ण शहरात लावले आहेत

पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून मुळा - मुठा नदी सर्वांचे लक्ष वेधणारी नदी आहे. परंतु नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, निर्माल्य, जलपर्णी यामुळे नदीची अवस्था फारच बिकट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नदी स्वच्छता आणि सुशोभीकरण हा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवतांना नदीपात्रातून जाणारे काही रस्ते बंद करून पर्यायी मार्ग सिद्ध केले जाणार आहेत, तर नदीच्या पातळीपर्यंत असलेले बाबा भिडे पूल, अमृतेश्वर पूल आदी काढून ते उंच करावे लागणार आहेत. 

गेली कित्येक वर्षे या प्रकल्पला मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपने पुनरुज्जीवन नदीचे समृद्धीकरण शहराचे असे बॅनर संपूर्ण शहरात लावले आहेत. परंतु कामाला अजूनही सुरुवात झालेली नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे दौऱ्यावर असताना हे बॅनर बघून फेसबुक लाईव्ह केले आहे. संपूर्ण शहरात बॅनर तर लावले आहेत, पण कामाला सुरुवात झाली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

सुळे म्हणाल्या,  मी गेल्या दोन दिवसापासून पुणे शहराच्या दौऱ्यावर आहे. आता सहज फिरताना शाहू सेतू पुलाजवळ भाजपचे हे पोस्टर पाहिले. त्यात भाजपने तीन प्रकारे नदीचे फोटो दाखवले आहेत. आधी मुठा नदी कशी होती. उद्या या नदीचे चित्र कसे असेल हे दाखवण्यात आले आहे. परंतु उद्याचा अर्थ काय? हे बॅनर बघून कळत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तर यात काही काम झालंय का, अथवा कामाला सुरुवात झालीये का असा सवालही उपस्थित केला आहे.  शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पुणे महापालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपने संपूर्ण पुणे शहरात अशा प्रकारचे बॅनर लावले आहेत. हे पाहून पुणेकरांना नदी स्वच्छ झाल्याचे वाटू लागले. परंतु प्रत्यक्षात कामालाही अजून सुरुवात झाली नाही. पालिकेत शंभर नगरसेवक असणाऱ्या भाजपला या नदीतील साधी जलपर्णीची काढता येत नाही. तर हे कधी नदी सुधारणा करणार असंही ते म्हणाले आहेत. 

काय आहे बॅनरवर 

भाजपने लावलेल्या बॅनरवर नदीचे दोन फोटो देण्यात आले आहेत. एका फोटोत 'आज' असे लिहून बिकट अवस्थेतील नदी दाखवली आहे. तर दुसऱ्या फोटोत 'उद्या' असे लिहून सुशोभीकरण झाल्यावरच्या नदीचे चित्र दाखवण्यात आले आहे.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस