शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पुण्यात पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून ढकलले; कारण वाचाल तर हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 19:23 IST

पुण्याच्या कोंढवा परिसरात एका पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. इमारतीच्या सुपरवायझर सोबत भांडण न केल्यामुळे चिडलेल्या पतीने हे धक्कादायक कृत्य केले

पुणे : पुण्याच्या कोंढवा परिसरात एका पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. इमारतीच्या सुपरवायझर सोबत भांडण न केल्यामुळे चिडलेल्या पतीने हे धक्कादायक कृत्य केले. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.   पतीच्या या कृत्याने कोंढवापोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी नितीन दसरथ दहिरे (वय ३२) याला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात २५ वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील एका निर्माणाधीन इमारतीत फिर्यादी या पतीसोबत राहतात. याठिकाणी लाईट फिटिंग चे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नितीन दहिरे याचे लाईट फिटिंग करण्यासाठी आलेल्या सुपरवायझर सोबत भांडण झाले होते. त्यावेळी पत्नीने आपली बाजू घेत सुपरवायझर सोबत भांडण केले नसल्याचा राग त्याच्या मनात होता.  याच कारणावरून त्यांच्यात शनिवारीही भांडण झाले. त्यानंतर नितीन दहिरे याने रागाच्या भरात फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चौथ्या मजल्यावरून लिफ्टसाठी सोडलेल्या मोकळ्या जागेतून त्यांना खाली ढकलून दिले. फिर्यादी या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

टॅग्स :KondhvaकोंढवाPoliceपोलिसmarriageलग्नWomenमहिलाArrestअटक