शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Maharashtra Budget: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पुण्यातील 'या' महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 20:50 IST

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला झुकते माप दिले आहे

पुणे :  हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक व तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी, खेड लोकसभा मतदार संघातील इंद्रायणी मेडिसीटी प्रकल्प, भीमा कोरेगाव विजयस्तंभ,रिंगरोड प्रकल्पासाठी 1 हजार 500 कोटीची तरतूद, नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासोबतच भीमा कोरेगाव विजयस्तंभाचा विकास आराखडा तयार करणे, अष्टविनायक विकासासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री असलेल्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. 

अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार (दि.11) रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातच महाराष्ट्राची अस्मिता, स्फुर्तीस्थान, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक व तुळापूर या परिसरात उभारण्याचे शासनाने ठरविले असल्याचे जाहीर केले. त्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून २५० कोटी रुपयांची तरतूद केली.  दरम्यान पुणे शहराजवळ ३०० एकर जागेमध्ये अत्याधुनिक 'इंद्रायणी मेडिसीटी' उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या वसाहतीत रुग्णालय, वैद्यकीय संशोधन, औषध उत्पादन, वेलनेस, फिजीओथेरपी केंद्र उपलब्ध असतील. सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल असे देखील पवार यांनी स्पष्ट केले. परंतू तरतूद मात्र केली नाही. मौजे पेरणे फाटा येथील भीमा कोरेगाव विजयस्तंभ व सोयी सुविधायुक्त स्मारक व परिसर विकासाची कामे हाती घेण्यात येतील. यासाठी आवश्यक असेल तशी तरतूद करण्यात येईल असे पवार यांनी स्पष्ट केले. पुणे- रिंगरोड प्रकल्पासाठी सुमारे १ हजार ९०० हेक्टर जमिनीचे प्रकल्प संपादन करावयाचे असून, त्याकरिता १ हजार ५०० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. नाशिक-पुणे ८३. नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाला केंद्र शासनाची मान्यता मध्यम मिळाली आहे. या प्रकल्पासाठी १६ हजार ३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ८० टक्के भार राज्य शासन उचलणार आहे. मुंबई-जालना-नांदेड रेल्वे हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. तर अष्टविनायक मंदिरांच्या सर्वांगीण विकास आराखड्याकरिता ५० कोटी विकास आराखडा रुपये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रBudgetअर्थसंकल्प 2022Ajit Pawarअजित पवार