शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये भाजपला धक्का द्यायचा म्हणजे शिवसेना अन् मनसेला फार जोर लावावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 18:00 IST

कोथरुडकरांच्या हातातून कमळ बाजूला काढण्याचे दोघांसमोरही उभे आव्हान

पुणे : कोथरूड विधानसभा मतदार संघ २००९ साली प्रस्थापित झाला. तेव्हापासून याठिकाणी भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. सद्यस्थितीत हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. पण आगामी निवडणुकीत मनसेच्या एन्ट्रीने मतांचं गणित बदलण्याची शक्यता आहे. परंतु भाजपचं इथं प्रचंड मताधिक्य असल्याने  शिवसेना आणि मनसेला जोरदार प्रचार करावा लागणार आहे. तसेच कोथरुडकरांच्या हातातून कमळ काढण्याचे आव्हानच दोघांसमोर उभे आहे.   

कोथरूड हाय प्रोफाईल असा मतदारसंघ आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेले चंद्रकांत पाटील इथे महायुतीचे उमेदवार आहेत. पक्षाचे दोन खासदार इथे मतदार आहेत. त्यातील एक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, दुसऱ्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी आहेत. पक्षाचे अनेक नगरसेवक आहेत. दुसरीकडे १० वर्षांपूर्वी या मतदारसंघाचा आमदार असलेले चंद्रकांत मोकाटे (उद्धवसेना) महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत. त्याशिवाय २०१९ च्या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार होऊन तब्बल ८० हजार मते मिळवणारे किशोर शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवार आहेतच. त्यामुळे हा सामना तिरंगी होणार आहे. त्यात शिंदे यांनी पुन्हा तेवढीच मते घेतली तर मोकाटे अडचणीत, नाही घेतली तर पाटील अडचणीत व दोघांमध्ये मतांची मोठी विभागणी झाली तर पाटील फायद्यात असे सध्याचे चित्र आहे. आजतरी ते पाटील यांच्या फायद्याचे आहेत. त्याचे रंग मतदान होईपर्यंत बिघडणार नाही याची काळजी ते घेतीलच. कोथरूड हा शिवसेनेचा (एकत्रित) बालेकिल्ला होता. आता फूट पडली आहे. १० वर्षांपूर्वी ताकद होती, पण मधल्या काळात कितीतरी राजकीय बदल झाले. भाजपचा हा नुसता बालेकिल्लाच नाही तर पुण्यातील राजधानी झाली आहे. त्याला धक्का द्यायचा म्हणजे शिवसेनेला किंवा मनसेलाही फार जोर लावावा लागेल असे दिसते.

चंद्रकांत पाटलांचा रस्ता मोकळा 

पुण्यात भाजपच्या वतीने कोथरूड मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत असताना अमोल बालवडकर यांनी भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून आले होते. पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत बंडखोरीचा इशारा दिला होता. अखेर त्यांनी बंडखोरीचा निर्णय मागे घेतल्याने चंद्रकांत पाटलांचा रस्ता सध्या तरी मोकळा झाला आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kothrud-acकोथरुडBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv Senaशिवसेना