शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूडच्या किस्किंदा नगरात सराईत गुन्हेगाराचा मामावर प्राणघात हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 22:09 IST

कोथरूडमधील किष्कींदानगर परिसरात भरदुपारी ही घटना घडली आहे.

पुणे/किरण शिंदे :कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील किस्किंदा नगर मध्ये मामासोबत वाद झाल्यानंतर भाच्याने आपल्या साथीदारासह मामावर प्राण घातक हल्ला केला. तर, भाच्यावर देखील कोयत्याने वारकरून त्याला जखमी केले. कोथरूडमधील किष्कींदानगर परिसरात भरदुपारी ही घटना घडली आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गणेश गाऊडसे, सचिन पोळेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश लोंढे (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. याघटनेत प्रकाश व त्यांचा भाच्चा अभय हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश व सचिन हे सराईत गुन्हेगार आहेत. दरम्यान, त्यांचा व तक्रारदारांचा भाचा अभय याच्याशी वाद झाला होता. शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर आरोपींच्या मनात त्याचा राग होता. 

दरम्यान, दुपारी तक्रारदार हे घराशेजारील मोकळ्या जागेत उभारले असता चौघेजन त्याठिकाणी आले. त्यांनी प्रकाश यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. तर, इतरांनी लाथाबुक्यांनी त्यांना मारहाण केली. भाचा अभय आला असता एकाने त्याच्यावरही कोयत्याने वार केला. पण, तो चुकवला. त्यामुळे तो हातावर बसला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkothrudकोथरूडkothrud policeकोथरूड पोलीसPuneपुणे