शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

Chandni Chowk Bridge Demolished: अवघ्या पाच सेकंदात झाला जमीनदोस्त; अखेर चांदणी चौकातील पूल इतिहासजमा

By नितीश गोवंडे | Updated: October 2, 2022 01:27 IST

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पडण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पडण्यात आला. अवघ्या पाच सेकंदात हा पूल जमीनदोस्त झाला. ६०० किलो   स्फोटकांच्या माध्यमातून हा पूल पाडण्यात आला. आता उर्वरित पाडकाम पोकलेनच्या सहायाने पडण्याचे काम सुरू झाले.

रात्री दहापासूनच चांदणी चौकाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. पूल रविवारी पहाटे एकच्या सुमारास पाडण्यात आला. हा पूल पाडण्याचे काम नोयडा येथील व्टिन्स टॉवर पाडणाऱ्या कंपनीने केले. पुण्यात पहिल्यांदाच स्फोटकाच्या मदतीने पूल पाडण्यात आला. त्याआधी सायंकाळी सात पासूनच पुलाच्या २०० मीटर परिसर निर्मनुष्य करण्यास सुरवात करण्यात आली होती. सायंकाळनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. साताऱ्याकडून येणाऱ्या जड वाहनांना दहावाजेपासून मागे थांबवण्यास सुरुवात केली होती. 

तसेच, डुक्कर खिंड येथून पुढे वाहने येऊन नये म्हणून त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. मुंबईकडून येणारी वाहने दहानंतर शहराच्या मध्य भागातून वळवण्यात सुरूवात केली. तसेच, उर्से टोलनाक्यावर जड वाहने थांबवण्यात सुरूवात करण्यात आली होती. यानंतर सकाळी आठपर्यंत या पुलाचा राडा-रोडा देखील उचण्यात आला. रात्री दहापासूनच पाठीमागे फुडमॉल, हॉटेल, धाबे, मोकळ्या जागा या ठिकाणी जड वाहतूक थांबवण्यास सुरुवात केली होती. यासाठी पुणे महामार्ग पोलिस विभागाचे १०० अधिकारी व कर्मचारी खंडाळा, वडगाव, उर्से टोलनाका, सारोळा, कराड, भुइंड या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.  कंट्रोल ब्लास्ट चा वापर...

चांदणी चौकातील हा पूल पाडण्यासाठी कंट्रोल्ड ब्लास्ट पद्धतीचा वापर करण्यात आला. हा ब्लास्ट करताना लोखंडी जाळीच्या आठ लेअर लावण्यात आलेल्या होत्या. त्याच्या किती यावेळी जिओ पद्धतीच्या पांढऱ्या कापडाचा धूळ न उडण्यासाठी वापर करण्यात आला होता. पूल पडल्यानंतर दहा मिनिटातच जेसीबीच्या सहायाने राडाराडा बाजूला करण्याचे काम सुरू झाले होते. या ब्लास्ट दरम्यान संपूर्ण पूल मात्र जमीनदोस्त झाला नाही. उर्वरित स्ट्रक्चर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Puneपुणे