शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Baramati News: बारामतीत एका चोराकडून तब्बल ९ लाखांच्या दुचाकी घेतल्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:14 IST

बुलेट, यामाहा, हिरोहोंडा, युनिकॉर्न, एफझेडचा समावेश

बारामती : बारामती तालुका पोलिसांनी दुचाकीचोरांना दणका देत मोठी कारवाई केली. बुलेट, यामाहा, हिरोहोंडा,युनिकॉर्न, एफझेड यासारख्या महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. यामध्ये साडेआठ ते नऊ लाखांच्या दुचाकी हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.

पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार तेजस सदाशिव कदम (रा. हिंगणेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) या दुचाकी चोराला ताब्यात घेत अटक केली  आहे. त्याच्याकडून पोलिसांनी बुलेट, यामाहा, हिरोहोंडा,युनिकॉर्न, एफझेड यासारख्या पुणे व पिंपरी चिंचवड भागातून त्याने चोरलेल्या महागड्या दुचाकी मिळविल्या आहेत.

बारामती एमआयडीसी परिसरातील सुभद्रा मॉल, एमआयडीसी परिसर, महिला हॉस्पिटल या भागातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर  पोलीसांनी अधिक गस्त वाढविली. दि. ६ रोजी अंमलदार राम कानगुडे, रणजित मुळीक, प्रशांत राऊत, अमोल नरुटे हे गस्त घालत होते. यावेळी सुभद्रा मॉलच्या पार्किंग परिसरात एक संशयिताचा वावर पोलिसांना संशयास्पद वाटला. त्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने या मॉल समोरून एक दुचाकी चोरल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यासंबंधीचा गुन्हा तालुका पोलिस ठाण्यात २८ फेब्रुवारी रोजी दाखल होता. अधिक चौकशीत त्याने  पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून अनेक महागड्या दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीbikeबाईक