शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बारामतीत घरातच सुरू होता वेश्या व्यवसाय; दोन पिडीत महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 17:26 IST

या प्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...

बारामती (पुणे) : बारामती शहरात हरिकृपानगर येथे चक्क एका सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय  शहर पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज रोहिदास बेंद्रे व शांतिलाल शिवाजी बेंद्रे (रा. कर्जत, जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली.

हरीकृपानगर या चांगल्या भागात एका अपार्टमेंटमधील सदनिकेत सुरू असलेल्या व्यावसायाची उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना माहिती मिळाली होती. त्यांनी निर्भया पथकासह त्यांच्याकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांना साध्या गणवेशात शहर पोलिस ठाण्यात पाठवले. पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना सूचना करत कारवाईचे आदेश देण्यात आले.

त्यानुसार महाडिक यांच्यासह उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, सपोनि प्रकाश वाघमारे, कर्मचारी अक्षय सिताफ, कल्याण खांडेकर, दशरथ जामदार आदींनी तेथे बोगस ग्राहक पाठवले. पंचांना पाचारण करण्यात आले. पाचशे रुपयांच्या तीन नोटा त्याच्याकडे देण्यात आल्या. बोगस ग्राहक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने आरोपींशी संपर्क साधला. त्यांनी वेश्यागमनासाठी महिला पुरविण्याचे मान्य केले. यावेळी बोगस ग्राहकाने पोलिसांना मिस काॅल करत इशारा केल्यानंतर छापा टाकण्यात आला.

या कारवाईत बोंद्रे यांच्यासह दोन महिलांना ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. घटनास्थळी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे ६९०० रुपये मिळून आले. तसेच तीस हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपींविरोधात अनैतिक मानवी व्यापार अधिनियम व भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायBaramatiबारामती