शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत चक्क खिल्लार गाईचे डोहाळे जेवण; पैठणी परिधान करून काढली मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 19:29 IST

हौसा नावाच्या जातीवंत माणदेशी खिल्लार गायीचे डोहाळे जेवण व ओटीभरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला

माळेगांव : माळेगांवात एका कुटुंबाने खिल्लार गाईचे केलेले डोहाळे जेवण कौतुकाचा विषय ठरला आहे.  हौसा असे या गाईचे नाव आहे. हौसा नावाच्या गाईचे डोहाळे व ओटीभरण निमित्त तिला छान सजविले होते. अतिशय सुंदर पैठणी परीधान करुन मिरवणूक काढण्यात आली होती. बारामती तालुक्यातील माळेगांव येथे हा आगळावेगळा समारंभ पार पडला. हौसा नावाच्या जातीवंत माणदेशी खिल्लार गायीचे डोहाळे जेवण व ओटीभरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाद्वारे धंगेकर व राणे कुटुंबाने समाजासमोर आदर्श निर्माण केला.

योगिता व नानासाहेब राणे (ता. नातेपुते, जिल्हा सोलापूर )यांनी आपली मुलगी सोनियाच्या विवाह प्रसंगी धंगेकर कुटुंबास (रा.माळेगाव,तालुका बारामती ) जातीवंत खिल्लार गाईचे वासरु भेट दिले.या वासराची सोनिया व संग्राम धंगेकर,पती संग्राम,सासु मिना व सासरे सुर्यकांत धंगेकर (चोरमलेवस्ती कारखाना रोड माळेगांव) यांनी गाईची मुलीप्रमाणे जोपासना केली.तिचे हौसा असे नाव ठेवले.

नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात  डोहाळे व ओटीभरण निमित्त तिला छान सजविले होते. अतिशय सुंदर पैठणी परीधान करुन मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच विविध पदार्थांचे रुखवत तयार केले होते.यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांना येवला पैठणी साडी भेट दिली. तसेच परिसरातील अनेक विधवांना हळदीकुंकू लावून सुवासिनींचा मान दिला. यानंतर उपस्थित सर्वांना प्रितीभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.  

टॅग्स :BaramatiबारामतीcowगायSocialसामाजिक