शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi: आळंदीत माऊली नामाचा गजर, संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:03 IST

एकादशी निमित्त शहरातील विविध मंदिरे, मठ आणि धर्मशाळांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजने असे धार्मिक कार्यक्रम पार पडले

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत देवशयनी आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान बुधवारी (दि.१७) अलंकापुरी टाळ - मृदंगाच्या गजराने आणि माऊली नामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली. तत्पूर्वी, आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे घंटानाद, पवमान अभिषेक व दुधारती झाली. त्यानंतर भाविकांना दर्शनबारीतून माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला. यावेळी वारकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे. दर्शनबारीतून भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.          दरम्यान पंढरीत लाखों वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी साजरी होत आहे. मात्र ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही; अशा असंख्य भाविकांनी आळंदीत माऊलींचरणी आपली वारी समर्पित केली. एकादशी निमित्त शहरातील विविध मंदिरे, मठ आणि धर्मशाळांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजने असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. आळंदीत दिवसभर हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. तरीही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पवित्र इंद्रायणीचे दर्शन घेत माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले.               अनेक भाविक माऊलींचे मुखदर्शन, स्पर्श दर्शन आणि मंदिर कळस दर्शन घेऊन धन्यता मानत होते. इंद्रायणी घाटावरही भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे वीस हजारांहून अधिक भाविकांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरAlandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022