जिल्ह्यातील क्रीडा संकुलाचे कामे दर्जेदार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:28+5:302021-02-05T05:03:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र स्पोर्टस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट प्लॅन अंतर्गत राज्यात क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. क्रीडा ...

Improve the quality of sports complexes in the district | जिल्ह्यातील क्रीडा संकुलाचे कामे दर्जेदार करा

जिल्ह्यातील क्रीडा संकुलाचे कामे दर्जेदार करा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र स्पोर्टस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट प्लॅन अंतर्गत राज्यात क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा असे, निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुल, येरवडा व जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक व्ही. व्ही. आय. पी. सर्किट हाऊस येथे आयोजित केली होती.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक विजय संतान, माहिती उपसंचालक राजेंद्र सरग, बारामतीचे मुख्‍याधिकारी किरण यादव उपस्थित होते.

प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त कायम करण्याबाबत चर्चा केली. त्यांनतर आमंत्रित सदस्य निश्चित करणे, क्रीडा संकुलाच्या जमाखर्चाचा आणि क्रीडा संकुल येथील सुविधांचा आढावा घेणे, क्रीडा संकुल येथील प्रस्तावित केलेल्या सुविधा तसेच क्रीडा संकुलाकरीता वास्तुशास्त्रज्ञ यांच्या नियुक्ती करणे, युवा वसतिगृहाची स्थापना करणे, क्रीडा संकुलाकरीता उर्वरीत रकमेची मागणी करण्यापूर्वी उपलब्ध जागेचा आढावा घेणे, बॅडमिंटन हॉल व जलतरण तलाव येथील प्रेक्षक गॅलरीमध्ये पायऱ्यांवर खुर्च्या बसविणे. अर्बन इन्फाकॉम या संस्थेचे कोरोना कालावधीतील भाडे शुल्क कमी करणे. प्रा. शिवाजी साळुंके यांनी सादर केलेला प्रस्ताव. योग अ‍ॅकॅडमीकरिता हॉल भाडेतत्वावर देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: Improve the quality of sports complexes in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.