शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय; महाविद्यालयातही मिळणार लॉगइन- आयडी, पासवर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 21:00 IST

१० एप्रिलपासून ऑनलाइन परीक्षा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणा-या प्रथम सत्राच्या ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लॉगइन- आयडी व पासवर्ड मिळण्यास अडचण निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाकडून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घेता येणार आहे.

विद्यापीठाच्या प्रथम सत्रच्या परीक्षा १० एप्रिल पासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांनी लॉग इन आयडी व पासवर्ड मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांक ईमेल आयडी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. परंतु, विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या मॉक टेस्ट दरम्यान काही विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड मिळत नसल्याचे दिसून आले.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षेसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त केले आहे. त्याच बरोबर विद्यापीठाशी संलग्न असणा-या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे लॉग इन आयडी व पासवर्ड पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. थेट विद्यापीठाशी संपर्क साधण्याऐवजी विद्यार्थी महाविद्यालयांमधील आपल्या परिचित प्राध्यापकांशी संपर्क साधून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घेऊ शकतात .त्यामुळे विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी विद्यापीठाने आवश्यक यंत्रणा उभी केली आहे. परंतु, वर्षभर अभ्यास केल्यानंतर केवळ लॉगइन- आयडी व पासवर्ड माहीत नसल्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणे योग्य नाही. तसेच सर्व महाविद्यालयाकडून आपल्या विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी अडचण येऊ नये याबाबत काळजी घेतली जाते. त्यामुळे महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचे लॉगइन आयडी व पासवर्ड देण्यात आले आहेत, असे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाonlineऑनलाइनStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयPune universityपुणे विद्यापीठ