शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'एमपीएससी' ची महत्वाची घोषणा; कोरोनाची लक्षणे असलेल्या उमेदवारांना 'पीपीई कीट' देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 13:08 IST

'एमपीएससी'ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेतली आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्य पूर्व परीक्षा २१ मार्च होणार आहे. परीक्षेला सामोरे जण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पालन करावयाच्या मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर 'एमपीएससी'ने जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना  कोविड १९ सदृश्य लक्षणे आढळून येत असतील त्यांना पीपीई किट उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. 

'एमपीएससी'ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेतली आहे. या बाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करता यावे म्हणून पुन्हा परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना एमपीएससीकडून मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज  दिले जाणार आहेत. असे असले तरी एमपीएससी ने दिलेल्या सूचनांचे पालन विद्यार्थाना करावेच लागणार आहे. जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, परीक्षा केंद्रात येताना उमेदवाराने तीन पदरी कापडाचे मास्क किंवा पट्टी बांधणे  आवश्यक आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छतेची काळजी घेऊन सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. ताप , सर्दी, खोकला, अशी लक्षणे असल्यास परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे. स्वतःचा जेवणाचा दाब घेऊन यावा. पाण्याची बाटली सोबत ठेवावी. राज्य सेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर असल्याने उमेदवाराला परीक्षा केंद्राबाहेर पडता  येणार नाही. तसेच उमेदवाराने एकमेकांचे शैक्षणिक साहित्य वापरण्यास मनाई आहे. तसेच सुरक्षित अंतर पाळण्याचे  आवाहन करण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थी