सुतारवस्तीतील गणरायाच्या विसर्जन आरती अंकिता पाटील यांच्या हस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:12 IST2021-09-21T04:12:48+5:302021-09-21T04:12:48+5:30
दरवर्षी गणराया सुतार वस्ती येथील शाळेच्या प्रांगणामध्ये गणराज मित्र मंडळ सुतार वस्ती यांच्यावतीने बसवण्यात येत असतो. चालू वर्षी कोरोनाच्या ...

सुतारवस्तीतील गणरायाच्या विसर्जन आरती अंकिता पाटील यांच्या हस्ते
दरवर्षी गणराया सुतार वस्ती येथील शाळेच्या प्रांगणामध्ये गणराज मित्र मंडळ सुतार वस्ती यांच्यावतीने बसवण्यात येत असतो. चालू वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे अतिशय साधेपणाने गणरायाची स्थापना केली. शेवटी गणरायाच्या विसर्जना दिवशी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते गणरायाची शेवटच्या दिवसाची आरती घेण्यासाठी हजेरी लावली. यावेळी पाटील यांचा शिक्षिका अर्चना सुतार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी आजिनाथ बोडके, सतीश बोडके, हनुमंत सुतार, दीपक बोडके, दिलीप बोडके, चंद्रकांत सुतार, आप्पासाहेब सुतार, पांडुरंग सुतार, संजय विठ्ठल सुतार, अर्जुन सुतार, सौरभ पांडुरंग सुतार, शशिकांत सुतार, सौरभ सुतार व सुतार वस्ती येथील सर्वच महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------------------------
फोटो क्रमांक - २० नीरा नरसिंहपूर अंकिता पाटील
पिंपरी बुद्रुक येथील सुतार वस्तीग्रामस्थांसोबत अंकिता पाटील.