शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मी मेंटली फिट :पंकजा मुंडेंची फिटनेस चॅलेंजवर प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 19:02 IST

मी मेंटली फिट आहे, फिजिकली माहिती नाही अशा शब्दात  महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी फिटनेस चॅलेंजची खिल्ली उडवली आहे.

ठळक मुद्देपेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यावर मीदेखील अस्वस्थ :पंकजा मुंडे मी मेंटली फिट : फिजिकल चॅलेंजवर पंकजा मुंडेंचे उत्तर 

पुणे :    मी मेंटली फिट आहे, फिजिकली माहिती नाही अशा शब्दात  महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी फिटनेस चॅलेंजची खिल्ली उडवली आहे. मोदी सरकारच्या कामगिरीची चार वर्षे या विषयावर आयोजित पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.

     यावेळी मुंडे यांना केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड यांनी दिलेले फिटनेस चॅलेंज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले आहे. त्यानंतर राज्यातील वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीही ते चॅलेंज स्वीकारले. त्याप्रमाणे आपणही ते स्वीकारणार का यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.आपल्या उत्तरावर सावरून घेताना माझे बॉस अर्थात नरेंद्र मोदी अठरा तास काम करत असल्याने मलाही ते करावे लागते असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या बाजूला बसलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही मी तर फिटच आहे, मला गरज नाही असे पुणेरी उत्तर दिले. 

    पेट्रोल डिझेलवरील वाढत्या किमतींवर त्यांनी यावेळी भाष्य केले.याबाबत मुख्यमंत्री महोदय केंद्र सरकारसोबत बोलत असून लवकरच किंमती कमी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सत्तेत असताना असो किंवा विरोधात असताना असो पेट्रोलच्या किंमती वाढल्यावर मी देखील अस्वस्थ होते अशा शब्दात त्यांनी मन मोकळे केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कारभारावर भाष्य केले आणि राबवलेल्या योजनांची माहिती सांगितली.त्यात जीवन ज्योती विमा योजना, स्वच्छ भारत मिशन, जनधन योजना,वय वंदन योजना, बीबीटीचा निर्णय अशा  विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी