शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती एमआयडीसीतील धक्कादायक प्रकार; कोटींच्या भूखंडाचा बेकायदेशीर व्यवहार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 18:32 IST

दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी...

बारामती (पुणे) : बारामती एमआयडीसीतील मोक्याच्या ठिकाणचा कोट्यावधींचा भूखंड कोणतीही निविदा, टेंडर, लिलाव प्रकिया राबविता एका खासगी फर्मला देण्यात आल्याचा गंभीर प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे. या प्रकरणात एमआयडीसी प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून हस्तांतरण प्रक्रिया राबविल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

शहरातील एका सामाजिक संघटनेने याविरोधात अवाज उठवत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. यातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या धक्कादायक प्रकाराबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसीतील डायनामिक्स कंपनीच्या समोरील भूखंड अनेक वर्ष वापरात नसल्यामुळे एमआयडीसीने परत घेतला. त्या भूखंडाचे औद्योगिक ते व्यापारी असे रूपांतर करून २०१९ मध्ये फेरलिलाव घेण्यात आला. या लिलाव प्रक्रियेत संबंधित खासगी फर्मने रीतसर हा भूखंड घेतला. त्याची एक चतुर्थांश रक्कम म्हणून ९६ लाख रुपये देखील फर्मने एमआयडीसीला भरले. मात्र, मुळ मालकाने  कोर्टात धाव घेतली. तसेच स्वत:च्या ओळखीचा वापर करुन लिलाव झालेला भूखंड परत मिळवला. त्यामुळे  रीतसर लिलाव प्रक्रिया होऊन ही भूखंड त्या खागसी फर्मला मिळाला नाही.

हा भुखंड मुळ  मालकाला  नियमबाह्य पध्दतीने  परत दिल्याचा आक्षेप आहे.  लिलावात खासगी फर्म हा भुखंड पावणे चार कोटी रुपयांना घ्यायला निघाली होती तोच प्लॉट एमआयडीसीने मूळ मालकाला काही लाखात दिल्याची  तक्रार आहे. यात शासनाच्या महसूलाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, डायनामिक्स डेअरी समोरील भुखंड काढून घेतल्यानंतर त्या खागसी फर्मने नवीन भूखंडाची मागणी केली. त्यानंतर त्या फर्मला एमआयडीसी चौकाजवळ औद्योगिक महामंडळाचा मोक्याच्या जागेवरील भुखंड अवघ्या  ३ कोटी २३ लाख रुपयांना हा भूखंड देण्यात आला. हा भुखंड कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता कसा काय दिला, याचं गौडबंगाल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यात एमआयडीसीच्या एका अधिका-याचा नातेवाईक देखील खासगी फर्ममध्ये  भागीदार असल्याचेही कागदपत्रांवरुन उघड झाले आहे. यामध्ये एमआयडीसीच्या अधिका-यांनी अगदी मोक्याचा भूखंड सगळे नियम धाब्यावर बसवून दिला असून यात एमआयडीसीचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा आक्षेप आहे. मोक्याच्या ठिकाणच्या भूखंडाचा एका रात्रीत कोणतीही प्रक्रीया न राबविता थेट प्लॉट नंबरच बदलून टाकल्याची सामाजिक संघटनेची तक्रार आहे. याप्रक़रणी चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात  आली आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारी