शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

कृषी शिक्षण विभागातील निवृत्त संचालकाकडे दीड कोटींची बेकायदा माया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 19:04 IST

जुलै १९८० ते जुन २०१४ या कालावधीत १ कोटी ५५ लाख १५ हजार ४२६ रुपयांची बेकायदेशीर माया कमावली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत विस्तार शिक्षण व साधन सामग्री विभागाचे संचालक म्हणून निवृत्त

पुणे : पत्नी आणि मुलाच्या मदतीने १९८० पासून दीड कोटींची बेकायदेशीर माया कमावणाऱ्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद विभागातील विस्तार शिक्षण व साधन सामग्री संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश नामदेव अंबुलगेकर (वय ६०) असे या संचालकाचे नाव आहे. ते महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत विस्तार शिक्षण व साधन सामग्री विभागाचे संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या बरोबर पत्नी मंगाराणी सुरेश अंबुलगेकर (वय ५६) आणि मुलगा नितीन सुरेश अंबुलगेकर (वय ३०, सर्व रा. मु. पो. मुखेड ता. मुखेड जि. नांदेड) यांच्यावर देखील या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.अंबुलगेकर यांच्या विरोधात काही तक्रार आली होत्या. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुहास नाडगौडा यांनी या प्रकरणाची चौकशी केली असून फिर्याद दिली. त्यानंतर अंबुलगेकर यांच्याकडे केलेल्या उघड चौकशी दरम्यान त्यांनी जुलै १९८० ते जुन २०१४ या कालावधीत १ कोटी ५५ लाख १५ हजार ४२६ रुपयांची बेकायदेशीर माया कमावली असल्याचे निष्पन्न झाले आहे. अंबुलगेकर यांची नांदेड, औरंगाबाद, लातूर आणि पुणे येथे मालमत्ता असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यात अनेक फ्लॅट आणि भुखंड असल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहेत. शासकीय सेवा काळात मिळालेला पगार व इतर भत्ते यांचे एकूण उत्पन्न आणि त्यांच्याकडे असलेली मालमत्ता याचे अंबुलगेकर यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. त्यांची २०१४ पासून चौकशी सुरू होती. या काळात त्यांनी ही सगळी संपत्ती कशाच्या माध्यमातून कमवली याची कागदपत्रे पोलिसांनी मागितली होती. मात्र या संपत्तीबाबत ते कोणतेही योग्य कागदपत्रे देऊ शकले नाही. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि पुण्यात असलेल्या मालमत्तेवर छापे टाकले. या कामात त्यांना पत्नी व मुलगा यांनी जाणीवपुर्वक संगनमत करून अपप्रेरणा दिली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिघांवरही विभागाने गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागagricultureशेती