शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

पुणे विद्यापीठाच्या 60 लाख रुपयांचे बेकायदेशीर वाटप; वित्त विभागाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 02:52 IST

कुलगुरूंनी दिले महिन्याभरापूर्वीच वसुलीचे आदेश , मात्र अद्याप कार्यवाही नाही..

ठळक मुद्देविद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून होते कुजबुज सुरू, रविवारी हा धक्कादायक प्रकार उघड

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देय नसलेल्या तब्बल 60 लाख रुपये निधीचे 'सेंट्रल पूल' अंतर्गत वितरित करण्यात आले आहे. मात्र,ही बाब लक्षात आल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी सर्व रक्कम वसूल करण्याचे आदेश महिन्याभरापूर्वी दिले. परंतु, अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विद्यापीठातील विविध विभागांना व प्राध्यापकांना केंद्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग व इतर संस्थांकडून संशोधन प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. संशोधनासाठी देण्यात आलेल्या निधी व्यतिरिक्त प्रशासकीय कामकाजासाठी सुमारे पंधरा टक्के रक्कम सुद्धा प्राप्त होते. ही रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून वित्त विभागातील अधिकारी व कर्मचारी मूळ वेतनाच्या प्रमाणात वाटून घेत होते. त्याला 'सेंट्रल पूल' असे संबोधले जाते. मात्र ,2019 मध्ये 'सेंट्रल पूल' अंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या रक्कमेवर पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने निर्बंध घातले होते. तसेच त्याबाबतचे परिपत्रकही विद्यापीठ प्रशासनाने काढले. त्यामुळे सेंट्रल पूल अंतर्गत निधी वाटपाचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. विद्यापीठाचे वित्त व लेखा विभागाचे अधिकारी अतुल पाटणकर यांनी आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना तब्बल 60 लाख रुपयांचे वाटप करणे बेकायदेशीर ठरत असल्याचे सुमारे महिनाभरापूर्वी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून त्यांची कान उघाडणी केली होती. तसेच वितरीत केलेली रक्कम तात्काळ वसूल करण्याचे आदेश दिले होते. मात्र,महिना उलटून गेला तरी त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कुलगुरू कार्यालयातून याबाबत वित्त विभागाला लेखी आदेश देण्यात आले आहेत.

विद्यापीठाकडे विविध संशोधन प्रकल्पाअंतर्गत प्राप्त होणाऱ्या रक्कमेपैकी प्रशासकीय कामकाजासाठी प्राप्त होणारी वेगळी पंधरा टक्के रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून सेंट्रल फुल अंतर्गत वितरित केली जात होती. परंतु, संशोधन प्रकल्प अंतर्गत केलेले कामकाज हा प्रशासकीय कामाचाच भाग आहे. त्यामुळे यापुढील काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही रक्कम वितरित केली जाऊ नये.असा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मध्ये घेण्यात आला होता. तरीही केवळ वित्त व लेखाधिकारी विभागातील कर्मचाऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत कुजबुज सुरू होती. अखेर रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.----------------------'सेंट्रल पूल'अंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून वसूल करावी,असे लेखी आदेश वित्त व लेखा विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाची कर्मचारी व अधिकाऱ्यांना देय नसलेली सर्व रक्कम वसूल केली जाईल.- डॉ नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठMONEYपैसाnitin karmalkarनितीन करमळकर