शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामे व गैरव्यवहारांची बजबजपुरी; पुणे पालिकेतील समाविष्ट गावांचे वाढले बकालपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:13 IST

न्यायालयाच्या आदेशामुळे ११ गावांचा महापालिकेत समावेश झाला, मात्र एकूण ३४ गावांमध्ये प्रशासन नावालाच शिल्लक राहिले असून तिथे बेकायदा बांधकामे व गैरव्यवहारांची बजबजपुरी माजली आहे.

ठळक मुद्देजमिनींचे व्यवहार तेजीत आले असून पैशांच्या प्रभावामुळे गुन्हेगारी कृत्यांमध्येही वाढसमाविष्ट गावांकडे प्रशासनाचे असेच दुर्लक्ष होत राहिले तर महापालिकेला तिथे काम करणे अवघड

पुणे : न्यायालयाच्या आदेशामुळे ११ गावांचा महापालिकेत समावेश झाला, मात्र आता ती ११ गावे व येत्या तीन वर्षात महापालिकेत समाविष्ट करणार असा सरकारने न्यायालयाला लिहून दिलेली २३ गावे अशा एकूण ३४ गावांमध्ये प्रशासन नावालाच शिल्लक राहिले असून तिथे बेकायदा बांधकामे व गैरव्यवहारांची बजबजपुरी माजली आहे. जमिनींचे व्यवहार तेजीत आले असून पैशांच्या प्रभावामुळे गुन्हेगारी कृत्यांमध्येही वाढ होत चालली असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.धायरी, शिवणे, उत्तमनगर, उंड्री, देवाची उरळी, फुरसुंगी, लोहगाव, केशवनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, साडेसतरा नळी ही ११ गावे सरकारने महापालिकेत समाविष्ट केली, मात्र त्यासाठी महापालिकेला काहीच आर्थिक मदत केलेली नाही. विद्यमान नगरसेवक त्यांच्या प्रभाग निधीतील काही भाग द्यायला तयार नाही, पदाधिकारी अंदाजपत्रकातून यासाठी म्हणून काहीही वर्गीकरण करायचे नाही असे म्हणतात, गावांमधून महसूल मिळण्याची सध्यातरी शक्यता नाही, सरकारने तर कधीचेच हात वर केले आहेत, त्यामुळे या गावांमध्ये काम करण्यासाठी निधी आणायचा कुठून असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. सध्या या गावांचा त्यांच्या लगतच्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयात समावेश करून प्रशासनाने तात्पुरती जबाबदारी पार पाडली आहे, पण गावांच्या व्यवस्थापनात प्रशासनाचा प्रभाव पडणेच थांबले आहे.या ११ गावांबरोबरच नऱ्हे, किरकटवाडी, नांदेड, खडकवासला, कोंढवे, कोपरे,शेवाळवाडी, मांजरी, वाघोली व अन्य अशी २३ गावेही येत्या तीन वर्षात महापालिकेत घेणार असे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात लेखी दिले आहे. त्यामुळे या गावांमध्येही आता चर्चा सुरू झाली आहे. प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांनी तिथे लक्ष केंद्रीत केले आहे. या बहुतेक गावांमध्ये सध्या सर्रासपणे बेकायदेशीर बांधकामे केली जात आहेत. त्यासाठी जमीनीचे मोठे व्यवहार होत आहेत. या खरेदीविक्री व्यवहारांमधून तिथे मोठ्या प्रमाणावर पैसे खेळत असून त्याचा परिमाण गुन्हेगारी वाढण्यावर झाला असल्याचे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होते आहे.समाविष्ट गावांकडे प्रशासनाचे असेच दुर्लक्ष होत राहिले तर बकालपणा वाढून नंतर महापालिकेलाच तिथे काम करणे अवघड होईल असे बोलले जाऊ लागले आहे. समाविष्ट गावांमधील ग्रामपंचायती विसर्जीत झाल्या आहेत. त्यांचे कर्मचारी महापालिकेत वर्ग झाले आहेत.  मात्र त्यांची संख्या अपुरी आहे जी गावे समाविष्ट झाली आहे त्यांच्यापेक्षाही जी झाली नाहीत तिथे अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे फक्त ११ च नाही तर उर्वरित २३ गावांसह एकूण ३४ गावांचा नियोजनबद्ध विकास आराखडा महापालिकेनेच तयार करावा अशी मागणी करणारे निवेदन हवेती तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री गिरीश बापट व महापालिका आयुक्तांकडे दिले आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका