देहूरोड : एका तरुणीने मित्राच्या मदतीने गर्भपाताच्या गोळ्याचा वापर करून वीस आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा गर्भपात करून देहूरोड येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यानंतर वैद्यकीय अधिकायांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.डॉ. यामिनी अद्वेत अडबे ( वय 55 रा. सोमटणे, मावळ ) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.पोलिसांकडून तसेच वैद्यकीय अधिकारी अडबे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीने मित्राच्या मदतीने गर्भपाताच्या गोळ्या मागवून त्याचा बेकायदेशीर वापर करीत स्वत:चा बेकायदेशीर गर्भपात करून घेतला . तरूणी उपचारार्थ देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासणी दरम्यान वीस आठवड्यांपेक्षा जास्त दिवस असल्याचे आढळून आले. तो बेकायदेशीर असल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड परिसरामध्ये ही चौथी घटना असून डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या कोणी दिल्या, त्याची विक्री कोण करीत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद गज्जेवार करीत आहेत.
देहुरोडमध्ये तरुणीने बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 20:46 IST