शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीचा आराखडा आयआयटी पवई करणार तयार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 14:04 IST

पुढच्या ५० वर्षातील वाहतुकीचा अभ्यास करून आराखडा तयार करणार

ठळक मुद्देशिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम घेतलेल्या ठेकेदार कंपनीने दिले काम

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पुढील ५० वर्षातील वाहतुकीचा अभ्यास करून आराखडा तयार करण्याचे काम आयआयटी पवई करणार आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो तयार करण्याचे काम घेतलेल्या ठेकेदार कंपनीने त्यांना हा अभ्यास करण्यास सांगितले आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे कार्यकारी अभियंता भारतकुमार बाविसकर यांनी ही माहिती दिली.  पीएमआरडीए या मेट्रोचे समन्वयक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पूल या मेट्रोला अडथळा ठरत होता. तो नुकताच पाडण्यात आला. त्यानंतर आता मेट्रोच्या खांबांच्या मध्यभागातून नवा पूल बांधण्यात येणार आहे. मात्र त्यापुर्वी या रस्त्यावरील वाहतूकीचा अभ्यास करण्यात येणार आहे. आयआयटी पवई चे तज्ज्ञ अभियंते हा अभ्यास करतील.पाडण्यात आलेल्या पुलाच्या बांधकाम रचनेबद्दल स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. तो पाडण्यात आल्यावर स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनावर बरीच टीका केली. आता काही पर्यावरणप्रेमी नागरिक तसेच जनंसघर्ष समितीने नवा पूल बांधतांना स्थानिक नागरिकांचे म्हणणे विचारात घेतले जावे, या मुख्य रस्त्याला असणारे पर्यायी रस्ते, त्यावरील वाहतूक, वाहनांची संख्या अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच नव्या पुलाची रचना करावी अशी मागणी या समितीने जाहीरपणे केली आहे.त्यामुळेच हे काम आयआयटीला दिले आहे. ते सध्याची वाहतूक, वाहनसंख्या, वाहनांचे प्रकार, गर्दीच्या वेळा याचा सगळ्याचा अभ्यास तर करतीलच शिवाय आराखडा तयार करताना पुढील ५० वर्षाच्या वाहतूकीचा अंदाज काढून त्याप्रमाणेच नियोजन करतील असे ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात आले. नव्या दुहेरी पुलाची रचना करताना सर्व आवश्यक गोष्टींचा विचार केला जाईल अशी माहिती देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठTrafficवाहतूक कोंडीIIT Mumbaiआयआयटी मुंबईMetroमेट्रो