शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीकडे दुर्लक्ष म्हणजे अन्याय; समस्या लवकर सुटल्या नाहीत तर आंदोलन - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:31 IST

हिंजवडी परिसर महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर महसूल निर्माण करतो, त्यामुळे येथील समस्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अन्याय आहे

पिंपरी : हिंजवडीची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. २६ जुलैला परत पाहणी करण्यासाठी येणार आहे. उद्योगमंत्र्यांना लवकरच बैठक घेण्याची विनंती केली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ जुलैला आढावा बैठक घेणार आहेत. समस्या लवकर सुटल्या नाहीत तर मी येथे येऊन आंदोलन करणार आहे. हिंजवडीचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलीनीकरण हा एकमेव उपाय आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

खासदार सुळे यांनी शुक्रवारी (दि. ४) हिंजवडी परिसरातील जलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि पाणीपुरवठ्याच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर संबंधित भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाहणीदरम्यान थेट शापूरजी पालोनजी समूहाचे प्रमुख शापूरजी मिस्त्री यांना फोन करून ‘जॉयविल’ प्रकल्पाशेजारील पाठक रोडवरील नागरिकांच्या तक्रारी मांडल्या. या रस्त्याचा काही भाग बिल्डरच्या मालकीचा असल्यामुळे तो सार्वजनिक वापरासाठी देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावर मिस्त्री यांनी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिल्याचे सुळे यांनी सांगितले.महिन्यांतून दोनदा हिंजवडीची पाहणी करणार

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आयटी पार्कच्या सुरुवातीच्या काळात दर्जेदार सुविधा होत्या. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून अराजकता माजली आहे. सरकारकडून केवळ आश्वासने मिळतात, कृती शून्य आहे. मी दर महिन्याला दोन वेळा दौरा करून कामांची पाहणी करणार आहे. हिंजवडी परिसर महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर महसूल निर्माण करतो. त्यामुळे येथील समस्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अन्याय आहे.

ठाकरे एकत्र येत असतील तर आनंद

सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत ठाकरे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र आहेत. ते एकत्र आल्याने राज्याचे भले होत असेल तर आनंद आहे.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेhinjawadiहिंजवडीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस