आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: June 11, 2017 04:01 IST2017-06-11T04:01:20+5:302017-06-11T04:01:20+5:30
पावसाळा दारात येऊन ठेपला, तरीही पालिका प्रशासनाने अद्याप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असणारी कामे पूर्ण केलेली नाहीत. परिणामी, शहरातील झोपडट्टीत

आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पावसाळा दारात येऊन ठेपला, तरीही पालिका प्रशासनाने अद्याप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असणारी कामे पूर्ण केलेली नाहीत. परिणामी, शहरातील झोपडट्टीत राहणाऱ्या नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. नदीपात्रातील गाळ, जलपर्णी काढण्यासह डे्रनेज सफाईची कामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात पालिका प्रशासनाने दिरंगाई केली असल्यास दिसून येत आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे पूर नियंत्रण स्थिती व पावसाळा पूर्वतयारीसाठी महिनाभरापूर्वी आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यात पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषी विभागांसह पालिका व पोलीस प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या कामांची पूर्तता करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. नदीपात्रालगत, पात्रातील झोपडपट्ट्या व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून योजना करावी. तसेच, नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढण्याचे आणि गटारसफाई करणे, औषधफवारणी, धोकादायक वृक्षांची छाटणी करणे आदी कामांसह जुन्या पुलांची व जुन्या इमारतींची बांधकामे पावसाळ्यापूर्वी करून घ्यावीत, अशा स्पष्ट सूचना
या बैठकीत देण्यात आल्या
होत्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
मॉन्सून काही तासांवर
येऊन ठेपलेला असताना
शहरातील नालेसफाईसह डे्रनेज सफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शहरातील
पुलांच्या डागडुजीची कामे सुरू आहेत.
पुलांच्या डागडुजीसाठी नदीपात्रात मातीचे बंधारे घालून ठेवण्यात आले आहेत. गणेश पेठेसह आणखी काही ठिकाणी डे्रनेज फुटलेल्या स्थितीत आहेत. पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे ३१ मेपूर्वी करण्याची मुदत आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत डे्रनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते उकरले
जात आहेत. नदीपात्रातील झोपड्या हटविण्याबाबत हालचाली
झाल्या नाहीत.
उकरलेल्या रस्त्ते अद्यापही बुजविले नाहीत
- शहरातील काही मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये रस्ता उकरून डे्रनेजसाठी पाईप टाक ले आहेत. मात्र, उकरलेल्या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरणे केलेले नाही. त्याचप्रमाणे रस्त्यात पडलेले खड्डे अद्याप बुजवलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- पालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यातील सर्व पुलांची, जुन्या इमारतींची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, रस्त्यांच्या साईडपट्ट्या भरून घेणे आवश्यक आहे. खेड-शिवापूर येथील घटनेची पूनरावृत्ती होऊ नये, यासाठी रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार करावेत.
आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे विविध विभागांकडून केली जात आहेत. काही विभागांनी कामाची पूर्तता झाली असल्याचे कळविले आहे; परंतु नालेसफाई, डे्रनेज सफाई, जलपर्णी काढणे आदी कामे सुरू आहेत. नियंत्रण कक्षामध्ये नोडल आॅफिसरची नेमणूक केली आहे.
- गणेश सोनुने, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन, पुणे महापालिका