शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : ऑडिट करायचे तर मुंबईबरोबर पुणे महापालिकेचेही करा, आदित्य ठाकरेंचे सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 22:13 IST

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची रॅली व सभा आयोजित करण्यात आली होती.

पुणे : मुंबई महापालिकेत आम्ही ऑडिट लावू, चौकशी करू असे मध्यंतरी चालले होते. तेव्हा मीच मागणी केली प्रत्येक पैशाचे ऑडिट करा आम्ही तयार आहोत. पण तसेच ऑडिट आता नागपूर, ठाण्यात, कल्याण-डोंबिवलीसह पुणे महापालिकेतही केले पाहिजे. प्रत्येक रूपयाचा खर्च लोकांना दिसलाच पाहिजे असे आव्हान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ, गुरुवारी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची रॅली व सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे बोलत होते. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार श्रीनिवास पाटील, आदित्य शिरोडकर, काँग्रेसचे सुनील केदार यांच्यासह तीनही पक्षाचे शहर पदाधिकारी उपस्थित होते.पुणे शहरात भाजपची महापालिकेत सत्ता असताना नागरिकांना मिळकतकरात देण्यात येणारी ४० टक्के सवलत रद्द करून कर लावण्यास सांगितला. तर दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यात मुंबईत ५०० स्वे. फूटापर्यंतच्या घरांना कर रद्द केला. एकदेखील नवीन कर न लावता ९० हजार कोटी रूपये मुंबई महापालिकेकडे सरप्लस आहेत. महापालिका ही शहरवासीयांच्या हितासाठी असते हेच हे भाजप सरकार विसरले असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आता एका पाठोपाठ एक भ्रष्ट्राचार चालू आहेत. हे गद्दार व भाजप सरकार निवडणुका लावायला तयार नाही, त्यांच्यात ही हिम्मतच राहिलेली नाही. कारण महाविकास आघाडीचे जे वातावरण राज्यात तयार झाले आहे ते पाहता ज्या दिवशी निवडणुका होतील तेव्हा हे गद्दार व भाजप सरकार साफ झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान सध्याचे मुख्यमंत्री भित्रे असून, केवळ खोक्याचे राजकारण करून राज्याचे वातावरण गढूळ करण्याचे राजकारण त्यांच्याकडून सुरू असल्याचेही ते म्हणाले. निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे, विजय हा आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.बापट यांना प्रचारात आणून क्रुरतेचा कळसचिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमदेवारी देऊन सहानभुती दाखवता. मग कसब्यात लोकमान्यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी देताना ही सहानभुती कुठे गेली. गंभीर आजारी असलेल्या खासदार गिरिष बापट यांना ऑक्सिजन सिलेंडर लावून प्रचारात आणले जाते, हा क्रुरतेचा कळस असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात सांगितले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेPuneपुणेkasba-peth-acकसबा पेठ