वेळ घेऊन न आल्यास दंड भरावा लागणार

By Admin | Updated: July 4, 2017 03:15 IST2017-07-04T03:15:08+5:302017-07-04T03:15:08+5:30

पिंपरी-चिंचवड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार पासिंग करण्यासाठी येण्याआगोदर वेळ घेऊनच यावे व वेळेत न आल्यास

If you do not take time, you will have to pay a penalty | वेळ घेऊन न आल्यास दंड भरावा लागणार

वेळ घेऊन न आल्यास दंड भरावा लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळवंडी : पिंपरी-चिंचवड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार पासिंग करण्यासाठी येण्याआगोदर वेळ घेऊनच यावे व वेळेत न आल्यास दंड वसूल करण्याचा फतवा काढल्यामुळे ग्रामीण भागातून येणारे वाहनचालक त्रस्त झाले आहे. या फतव्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ व मुळशी हे ग्रामीण भागातील पाच तालुके येत आहेत.
या ठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त येत असतात या प्रादेशिक परिवहन कार्यालयात या आगोदर प्रथम येईल. त्यास प्राधान्य या तत्वावर वाहन पासींग केले जात होते. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक मोटार वाहन निरीक्षक दिवसाला फक्त पंचवीस वाहने वाहने पासिंग करू शकतात. या नियमानुसार कार्यालयात व्यवस्थित काम चालु असताना चार हजार किलोच्या पुढे वजन असणाऱ्या वहानांना पासिंगसाठी आगोदर तारीख आणि वेळ घेऊनच या असा फतवा काढला आहे. या तारखेस वाहन न आल्यास त्या वाहनधारकाकडून चारशे रुपये दंड वसूल केला जातो व त्यास पुन्हा नव्याने तारीख आणि वेळ घ्यावी लागते.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या फतव्यामूळे ग्रामीण भागातून वेळ व पैसे खर्च करून येणाऱ्या वाहनधारकास मनस्ताप सहन करावा लागतो. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या नवीन फतव्यास वाहनधारकांनी तिव्र प्रकारचा विरोध दर्शविला आहे.
या जाचक अटींमूळे संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की प्रत्येक वाहनाधारंकांची कामे लवकर व सुरळीत होण्यासाठीआमचे प्रयत्न सुरु असून त्यासाठीच सदर पध्दत चालु केली असल्याचे त्यांनी सांगितले.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

येथील महिला कर्मचारी व अधिकारी आपण महिला आहोत आपल्यावर कुणीही कारवाई करु शकत नाही. या आविभार्वात वागतात असल्याबाबतच्या तक्रारी आहेत.
याउलट येणाऱ्या नागरिकांनाच तुम्हाला महिला कर्मचाऱ्यांबरोबर कस वागावं हे समजत का असा उलट प्रश्न केला जात असल्यामुळे येणारा नागरिक आपल्यावर कारवाई होईल. या भीतीमुळे गप्प बसतो व तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतो. याबाबत वरिष्ठ अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत.

Web Title: If you do not take time, you will have to pay a penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.