शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ता जगवायचा असेल तर काँग्रेसला स्वबळावरच लढावंच लागेल; नाना पटोलेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:50 IST

स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस स्वबळावरच लढणार : नाना पटोलेंचा पुनरुच्चार

पुणे: कार्यकर्ता जगवायचा असेल तर स्वबळावरच लढावे लागेल ही भूमिका श्रेष्ठींना पटली, त्यांनी संमती दिली, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वबळावरच लढणार असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. महापालिकेचा प्रभाग दोनचा राहिल असेही ते ठामपणे म्हणाले.

काँग्रेसच्या आजीमाजी नगरसेवकांची बैठक शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी त्यांंनी स्वबळाची मागणी तूमच्यासाठी केली. ती राहुल गांधींनी मान्य केली. आता जबाबदारी तुमची आहे, एक राहा, प्रामाणिक राहा विजय आपोआप होईल असा सल्लाही त्यांनी दिला. शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, ऊल्हास पवार पालिकेतील गटनेते आबा बागूल तसेच पक्षाचे आजीमाजी नगरसेवक, आमदार, शहरातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

पटोले म्हणाले, राज्यातच नाही तर आता देशातच राजकीय बदल होणार आहे. महापालिकेचा तर विषयच नाही. काँग्रेस हवी ही आता जनतेचीच भावना आहे. ल़ोक त्यांना कंटाळलेत. तुम्ही आता पात्र व्हायला हवे. पक्ष महत्वाचा हे नेहमी लक्षात ठेवा. प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्व मदत करू, पण काम करणारे दिसायला हवं. केंद्र सरकारच्या धोरणाचा झळ सामान्य नागरिकांना बसू लागली आहे. सर्व क्षेत्रात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. याच मुद्द्यांवर आपल्याला त्यांना हरवायचं आहे.

उपस्थितांना त्यांनी अनेक सुचना केल्या. पुणे शहराला वेळ द्या या मागणीला प्रतिसाद देत हवा तेवढा वेळ देईल, तूमच्याकडे अनूभवींची संख्या आहे, त्यांचा सल्ला घ्या, आतापासूनच निवडणूकीचे नियोजन करा असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसElectionनिवडणूक