शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र यायचं असेल, तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल; शरद पवारांच्या आमदाराचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:54 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुणे जिल्ह्यात महापालिका निवडणूक एकत्र लढले. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही पक्ष कायमचे एकत्र येण्याच्या चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत. 

पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) दोन्ही पक्ष एकत्र आले. त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे निकालातून समोर आले. पण, आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष कायमचे सोबत येणार का, या चर्चेने डोकं वर काढले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी एकत्र यायचं असेल, तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल, असे विधान केले. 

महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाची कामगिरी चांगली राहिली नाही. आता दोन्ही पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दोन्ही पक्ष ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात आहेत. अजित पवार आणि शरद पवार कायमचे एकत्र येणार का, अशी चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे. त्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून भूमिका मांडण्यात आल्या. उत्तमराव जानकर काय म्हणाले?

आमदार उत्तमराव जानकर यांनी याबद्दलची भूमिका मांडताना सांगितले की, "ते एकत्र येतील, मला वाटत नाही. कारण शरद पवारांचा विचार हा वेगळा आहे आणि अजित पवार सत्तेत आहेत. त्यामुळे असे होईल का असे मला वाटत नाही. कुठला तरी निर्णय अजित पवारांना तरी घ्यावा लागेल. म्हणजे सत्तेतून बाहेर तरी पडावं लागेल. नसेल, तर मग शरद पवारांच्या विचाराने पुढे जावं लागेल. धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत नाही." 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते उमेश पाटील म्हणाले, "उत्तम जानकर हे बोलत असतात. त्यांच्या मनात असेल, तर काही राहत नाही. परंतू शेवटी पक्षाच्या पातळीवरचा निर्णय आहे. ते वरिष्ठ स्तरावर घेतले जातात. त्यांनी मत व्यक्त केले आहे. ते त्यांचे वैक्तिगत मत आहे." 

"जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. जिल्ह्यामध्ये, संपूर्ण ग्रामीण भागात आज राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणी ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद आहे", अशी भूमिका उमेश पाटील यांनी मांडली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar must leave power to unite: Sharad Pawar's MLA.

Web Summary : NCP factions consider uniting for local elections. Sharad Pawar's MLA, Uttamrao Jankarikar, stated Ajit Pawar must exit the ruling coalition for unification. Ajit Pawar's party leader, Umesh Patil, dismissed it as a personal opinion. The party aims to win the district council elections.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण