शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही : अ‍ॅड प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 19:38 IST

घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही, त्यामुळे घराणेशाही, मक्तेदारीला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले.

पुणे : घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही, त्यामुळे घराणेशाहीला, मक्तेदारीला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले. पुणे लाेकसभेचे वंचितचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ एसएसपीएमएसच्या मैदानावर आंबेडकरांची सभा झाली त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून पवारांवर नाव न घेता जाेरदार टीका केली. 

आंबेडकर म्हणाले, एका नेत्याने माढातून माघार घेतली तर नातवाला मावळमधून उमेदवारी दिली. त्या नातवाचे गुण सांगितले तर आजाेबांना धक्का बसेल त्यांना काही झाले तर दाेष माझ्यावर यायचा. इंदू मिल येथील स्मारकाच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात माेदी मला म्हंटले तुम्ही मला भेटत नाहीत. तेव्हा मी म्हंटलं कामाशिवाय मी काेणाला भेटत नाही. परंतु मला माेदींना सांगायचंय की मी त्यांना आता 23 मे नंतरच भेटणार आहे. गुजरातमधील राखीव संसाधन म्हणून ठेवण्यात आलेला मीठाचा डाेंगर माेदींनी एका व्यवसायिकाला विकल्याचा आराेपही आंबेडकरांनी यावेळी माेदींवर केला. माेदी देशातील संपत्ती कवडीमाेलाने विकत असल्याचेही ते म्हणाले. 

आपल्या भाषणात आंबेडकरांनी काॅंग्रेसवर देखील टीकेची झाेड उठवली. काॅंग्रेसच्या खादीमध्ये खाकी शिरत असल्याचे ते म्हणाले. काॅंग्रेसला पुण्यात उमेदवार सापडत नव्हता, परंतु त्यांनी आमच्याशी बाेलणी केली नाही. यंदाच्या निवडणुकीत काॅंग्रेस तिसऱ्या स्थानावर असल्याने आमची लढत थेट भाजपाशी आहे. मिलिंद एकबाेटे आणि संभाजी भिडे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आपण सत्तेत आलं पाहिजे असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpune-pcपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी