शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'जर का पैसे घेत असतील तर त्याचं काय खरं नाही...' भावकीला ‘अजितदादां’चा भर सभेत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 18:55 IST

 विहीरीमागे ७५ हजारांची मागणी करणाऱ्या भावकीला ‘अजितदादां’चा भर सभेत इशारा

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार हे सडेतोड नेते म्हणुन ओळखले जातात.बारामतीकरांनी त्यांच्या या गुणाचा अनेकदा अनुभव घेतला आहे.शनिवारी(दि १) देखील बारामतीकरांनी हा अनुभव घेतला.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्याकडे तक्रारीबाबतचे निवेदनाचा संदर्भ देत आमची भावकी विहीरीमागे ७५ हजार रुपये मागत असल्याची तक्रार आल्याचे सांगितले.तसेच ते पैसे घेत असतील तर त्यांचे काही खरें नाही,असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी भर सभेत स्टेजवरुन संबंधितांना दिला.उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी ते एका कार्यक्रमात बोलत होते.यावेळी पवार म्हणाले, बर्हाणपुर येथे एकाने मला निवेदन दिले की, सुजय पवार कोण आहे का? पंचायत समितीकडून शेतकऱ्यांना मोफत विहीर देण्याची योजना आहे. मात्र या कामात आमची एक भावकीच पैसे मागत असल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. एका विहिरीमागे ७५ हजार रुपयांची मागणी होत आहे.याबाबत ‘बीडीओं’नी नोंद घेण्याची सुचना यावेळी पवार यांनी केली.ते पुढे म्हणाले की मी एकच बाजू बघत नाही. याबाबत शहानिशा करावी लागेल. जर का पैसे घेत असतील तर त्याचं काय खरं नाही,अशा शब्दात पवार यांनी कारवाइचा इशारा दिला.तसेच घेत नसतील तर चांगल्या कामासाठी शुभेच्छा आहेत, असे पवार म्हणाले.बारामतीत ‘डीसीएम’ कार्यालयाचे आता चाैघेजण आहेत.पण नावालाच चाैघे दिसून उपयोग नाही.काम पण चाैपटीने वाढले पाहिजे,असे उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या कार्यालयाच्या अधिकार्यांना सुनावले. बारामतीची आदर्श वास्तू म्हणून 'बारामती पंचायत समिती'कडे पाहिले जाते. या ठिकाणी शासन प्रशासनाकडून काम हे तसंच व्हावे अशी अपेक्षा आहे. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, नुसता दिखावा करून उपयोग नाही. खुर्चीवर बसलेल्या माणसाने हातात घेतलेला कागदातील माणूस ओळखला पाहिजे. नुसता कागद वाचून चालत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांची कामे वेळेत आणि तत्परतेने करण्याचा सल्ला दिला. 

...‘आप मुझे बेवकुफ समजते हो क्या?बारामती येथे एका राष्ट्रीयकृत बॅकेचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी बॅंक अधिकार्यांची ओळख करुन घेताना पवार यांंना संबंधित बॅंक व्यवस`थापकांनी पानसदृश्य काहीतरी खाल्ल्याचे लक्षात आले.आप पान खाते है क्या? असा सवाल पवार यांनी त्या अधिकार्यांना केला.अधिकार्यांनी नकार दर्शविताच ‘आप मुझे बेवकुफ समजते हो क्या? आप को रीक्वेस्ट करता हुं, कुछ गलत खाते हो तो,मत खाओ,इससे कॅन्सर वैगेरा प्राॅब्लेम हो सकती है,अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी त्या अधिकार्याला सुनावले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारBaramatiबारामती