शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 14:14 IST

जालिंदर सुपेकरांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले,"ज्या आरोपांमध्ये तथ्य असेल, पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल.

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलतांना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात सध्या एशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प सुरू असून तो 2026 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील ऊर्जा गरजा भागवण्यात मोठी मदत होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यात सध्या 5 लाख सौर पंपांची गरज आहे आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सर्व सरकारी महत्त्वाच्या इमारतींनी सौरऊर्जेकडे वळले पाहिजे, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. हायड्रोजन क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी विशेष उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले. हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे आणि या क्षेत्रात महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. असे फडणवीस म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी जालिंदर सुपेकरांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले,"ज्या आरोपांमध्ये तथ्य असेल, पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल. आम्ही कोणालाही वाचविणार नाही, पण बेबनाव आरोपांवर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. असं म्हणत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.सामाजिक विभाग निधीबाबत स्पष्टीकरणसामाजिक विभागाच्या निधीविषयी आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आपल्या बजेटच्या नियमानुसार, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी असलेल्या योजना त्या विभागाच्या हेडखालीच टाकाव्या लागतात. त्यामुळे इतर कुठल्या विभागाकडून पैसे वळवलेले नाहीत. अजितदादांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले आहे की यावेळी अधिक तरतूद करण्यात आली आहे आणि ही तरतूद पूर्वीपेक्षा जास्त आहे. पैसा कुठेही वळवलेला नाही; त्याच विभागांमध्ये योग्य प्रकारे खर्च करण्यात आला आहे, असंही त्यांनी नमूद केलं.सामना केल्या जाणाऱ्या टीकेबाबत फडणवीसांचा रोखठोक सवाल‘सामना’ या वृत्तपत्रावर टीका करत फडणवीस म्हणाले, सामना कोणती सर्टिफिकेट देणारी संस्था आहे का? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सामना होता. असं म्हणत टीका केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस