शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बसपा चे सरकार न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ - मायावतींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:19 IST

जातीवाद, भांडवलशाही विचारांमुळे बहुजन समाजाच्या स्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही, म्हणून या पक्षांना मतदान करून अपमानित होऊ नका

पुणे : पक्षाला सरकार स्थापन करायचे मात्र न झाल्यास तारतम्य ठेवत आगामी सरकार बनवणाऱ्या पक्षाला समर्थन देवून आणि सरकारमध्ये सहभागी होवून लोकांना न्याय देवू, असे आश्वासन बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी पुण्यात बोलताना दिले आहे. वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांच्या प्रचारार्थ येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मैदानात आज सभा पार पडली यावेळी त्या बोलत होत्या. बहुजन समाज पक्षाने मागील चार टर्ममध्ये तळागाळातील समाजाला नेतृत्व देत उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. प्रत्येक व्यक्तिला नोकरीची शाश्वती ,पक्के घरे आणि अनेक योजनांचा लाभ दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही उपेक्षित वर्गाचा प्रतिनिधी 'बसपा'च्या माध्यमातून विधीमंडळात पोहोचवायला हवा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच यावेळी त्यांनी निवडणूक स्वबळावर का लढवण्याचा निर्णय घेतला यावरही भाष्य केले. बसपने कायम अनेक पक्षांना पाठिंबा दिला आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा इतर पक्षांसोबत मिळून बसप ने निवडणूक लढवली तेव्हा तेव्हा दलितांचे मत सोबत असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला गेली. परंतु जातीवादी मानसिकतेमुळे त्यांच्या पक्षाचे बहुतांश मत आमच्या पक्षाला मिळत नाही. त्यांची मत अंतर्गत रित्या दुसऱ्या उमेदवाराला जातात. त्यामुळे यंदा लोकसभेसह विधानसभा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण मायावती यांनी दिले.

उत्तरप्रदेश राज्यात आतापर्यंत कॉंग्रेस, भाजप तसेच इतर पक्षांचे 'गठबंधन' सरकार राहिले आहे. मात्र जातीवाद, भांडवलशाही विचारांमुळे दलित, आदिवासी,अल्पसंख्यांक, मुस्लिम आणि ओबीसींच्या स्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही. त्याचप्रमामाणे बेरोजगार, शेतकरी, मजूरांची स्थिती हलाखीची आहे. म्हणून या पक्षांना मतदान करून अपमानित होऊ नका. डॉ. बाबासाहेबांनी या वर्गांच्या उन्नतीसाठी संविधानात कायदेशीर अधिकार दिले असल्याचे देखील मायावती यांनी मत व्यक्त केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी