शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

" राज्य सरकारने जर आता दर्शनासाठी मंदिरं खुली केली नाही तर मनसे ती करेल..! "

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 20:09 IST

कोरोनाचे नाव पुढे करून धार्मिक स्थळे उघडायला ठाकरे सरकार घाबरते आहे का?

ठळक मुद्देपुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिर मनसेने उघडत केले आंदोलन

पुणे : अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात राज्यात सर्व जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सरकारने मद्यालये, हॉटेल, दुकाने,एसटी बसेस यांच्यानंतर आता रेल्वे सुरु करण्यास देखील परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल या भीतीने अद्यापही राज्यातील मंदिरे कुलुपबंद आहे. कोरोनाचे नाव पुढे करून देवालये उघडायला ठाकरे सरकार घाबरते आहे का ? कोरोना काय फक्त देवळातच आहे ? असा खडा सवाल उपस्थित करत शासनाने जर आता मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली नाही तर मनसे राज ठाकरेंच्या आदेशानुसार मंदिरं उघडेल, असा गर्भित इशारा मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिर बुधवारी (दि. ७) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघडत तिथे अभिषेक व होम करत आंदोलन केले. तसेच देवबाप्पा, राज्य सरकारला धार्मिक स्थळे सुरु करण्याची सुबुद्धी देवो असे म्हणत नागरिकांना कोरोनामधून लवकरात लवकर मुक्त कर व त्यामुळे आलेली बेकारी व महागाई यातून जनतेची सुटका कर असे साकडे देखील मनसेतर्फे घालण्यात आहे. या आंदोलनात मनसे नेते बाबू वागसकर,विजयराव तडवलकर, प्रल्हाद गवळी , राम बोरकर ,हेमंत बत्ते, सुनील कदम , राहुल गवळी , नरेंद्र तांबोळी, प्रशांत मते ,गणेश नायकवडी, आकाश धोत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

मनसेचे अजय शिंदे म्हणाले, स्वतःला हिंदुत्ववादी समजणारी व त्याच्याच नावावर मते मागणारी शिवसेना सत्तेत आहे. मात्र सेनेचा मुख्यमंत्री असताना देखील राज्यातील मंदिरे बंद आहे हे दुर्दैवी गोष्ट आहे. यावरूनच शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परंतु, एकीकडे सरकार महसुलासाठी मद्यालये उघडते तर दुसरीकडे कोरोनाचे नाव पुढे करून देवालये उघडायला घाबरते आहे. कोरोना काय फक्त देवळातच आहे का ? महाराष्ट्रातील देवालये न उघडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यावर नक्की कोणाचा दबाव आहे ? हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला. 

गेल्या महिन्यातच महाराष्ट्रातील देवस्थानाची प्रमुख मंडळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटली घेतली होती. त्यानंतर राज यांनी सरकारला मंदिरे सुरु करावीत अशी मागणी देखील केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत दबावापोटी मुख्यमंत्री राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेताना दिसत नाही. परंतु, हे सरकार निधर्मी असल्याची टीका करत जर सरकारने लवकरात लवकर मंदिरे उघडली नाही तर जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल हा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिरState Governmentराज्य सरकारRaj Thackerayराज ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या