शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Supriya Sule: "जरा तुम्हाला कोणी त्रास दिला तर मी ढाल बनून उभी राहील", सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 15:54 IST

आपण सत्तेत असू किंवा विरोधी पक्षात असू निधी, वीज, पाणी या बाबी तुम्हाला कमी पडू देणार नाही

इंदापूर  : त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवार दहा उमेदवार देवून आठ खासदार निवडून आणू शकतात तर तालुका पातळीवर आपण काही करु शकत नाही का. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बँकेपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणूका लढवण्याचा मनसुबा खा.सुप्रिया सुळे यांनी जाहीर केला. जिस को जो लढना है लढेंगे.मैदान खुला और खाली है, त्यामुळे सगळ्यांना तिकीटे मिळणार असे खुले आश्वासन देत खा.सुप्रिया सुळे यांनी सर्व आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर इंदापूरकरांचे आभार मानण्यासाठी त्या गुरुवारी (दि.६ ) रात्री इंदापूरात आल्या होत्या. शहा सांस्कृतिक भवनात त्यांनी कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला.    त्या म्हणाल्या की, बेरोजगारी, महागाई, शेतीमालास  भाव नाही, प्रचंड भ्रष्टाचार याला थकून लोकांनी आपल्याला मतदान केलेले आहे. त्यामुळे आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. इंदापूरकरांनी माझ्यासाठी व शरद पवारांसाठी खुप संघर्ष केला व झेलला. अपेक्षेपेक्षा जास्त मते पदरात टाकली. बारामती लोकसभा व इंदापूर विधानसभा मतदार संघातील मतदारांसमोर नतमस्तक होऊन आपण त्यांचे मनःपूर्वक आभार मानत आहोत. कार्यकर्ते, बुथकमिटीतील लोक व मतदार यांच्यामुळे आपण विजयी झालो. पुढील काळात बुथकमिटीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्याशी चर्चा करुनच विकासकामासाठी निधी टाकला जाईल, असे संकेत सुळे यांनी दिले.    आपण सत्तेत असू किंवा विरोधी पक्षात असू निधी, वीज, पाणी या बाबी तुम्हाला कमी पडू देणार नाही. पाणी वीज वैयक्तिक कुणाची नसते. ते देश देत असतो. सरकारे देतात. त्यामुळे निवडणूकीत झालेल्या भाष्यांबाबत चिंता करु नका. कमी मतदान झाले म्हणून वा राजकीय कारणाने कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर ढाल बनून सुप्रिया सुळे तुमच्यासमोर उभी राहिल. कारण गलिच्छ राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.    केंद्र सरकारने इथेनॉलचे धोरण चुकवल्यामुळे शेतकऱ्यांचे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्या धोरणाबाबत संसदेत फक्त आपणच आवाज उठवला. दुधाचा भाव शहरात दोन रुपयाने वाढला व ग्रामीण भागात दोन रुपयाने कमी झाला. याबाबत आज पन्नासाव्या वेळी दुधाचे भाव वाढवण्याबद्दल आपण सरकारला विनंती केली आहे. पाच रुपयांचे अनुदान सर्वांना मिळालेले नाही. यावर उपाय झाला नाही तर पुढच्या आठ ते दहा दिवसात दुध व कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागण्यांसाठी पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,  रोहित पवार यांच्यासह आपण उद्या बारामती व पुरंदरचा दुष्काळी दौरा करणार आहोत.१२ तारखेला शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौ-यावर येणार आहेत. दि.१३ व१४ रोजी ते बारामतीचा दुष्काळी दौरा करणार आहेत. प्रत्यक्ष पावसास सुरुवात होत नाही. शासन उपाययोजना करत नाही तोपर्यंत दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळेल याच्यासाठी काम करु

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेIndapurइंदापूरCentral Governmentकेंद्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण