शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचे प्रवासी घटल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनावर येतेय संक्रांत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 21:03 IST

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे जमविताना पीएमपी प्रशासनाला दर महिन्याला धावपळ करावी लागत आहे.

ठळक मुद्देपीएमपीला तिकीट विक्री, जाहिरात, दंडाच्या माध्यमातून एकुण खर्चाच्या केवळ ७५ टक्के उत्पन्न आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये केवळ वेतनासाठी ४३८ कोटी रुपये खर्चवेतनासाठी दरमहा ३६ कोटींहून अधिक पैसे देखभाल-दुरूस्ती, साधन-सामुग्रीच्या खर्चातही कपात करावी लागत असल्याची स्थिती

पुणे : प्रवासी संख्या कमी झाल्यास पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संक्रांत येत आहे. दिवाळीच्या काळात प्रवासी संख्येत घट झाल्याने पीएमपीला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी, सुमारे साडे तीन हजार कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी प्रशासनाकडे पैसेच शिल्लक राहिले नाहीत. या कर्मचाऱ्यांना निम्मा नोव्हेंबर महिना उलटल्यानंतर वेतन मिळाले आहे. यावरून पीएमपीच्या ढेपाळलेल्या आर्थिक स्थिती वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पीएमपीला तिकीट विक्री, पास, जाहिरात, दंडाच्या माध्यमातून एकुण खर्चाच्या केवळ ७५ टक्के उत्पन्न मिळते. तर दोन्ही महापालिकांकडून संचलन त्रुटीच्या रुपाने २५ टक्के रक्कम मिळते. त्यातूनच दर महिन्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन करावे लागते. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये केवळ वेतनासाठी ४३८ कोटी रुपये खर्च झाले होते. दरवर्षी या खर्चामध्ये वाढ होत चालली आहे. वेतनासाठी दरमहा ३६ कोटींहून अधिक पैसे लागतात. हा खर्च एकुण खर्चाच्या ५१ टक्के एवढा आहे. त्यातुलनेत पीएमपीला मिळणारे दैनंदिन उत्पन्न कमी आहे. त्यामुळे मागील वर्षी पीएमपीला तब्बल २०४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ही स्थितीत अजून काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे जमविताना प्रशासनाला दर महिन्याला धावपळ करावी लागत आहे.नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएमपीतील कायमस्वरूपी सुमारे साडे तीन हजार कर्मचाऱ्यांना १० तारखेला वेतन होणे अपेक्षित होते. दिवाळीनिमित्त काही दिवस आधी त्यांना बोनस मिळाला होता. तर वेतनाचा दिवसही दिवाळीच्या जवळपास असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा होता. पण वेतनासाठी त्यानंतर त्यांना आठ दिवस वाट पाहावी लागली. दि. १७ नोव्हेंबरला प्रशासनाने त्यांचे वेतन केले. त्यासाठी ११ कोटी रुपये जमविण्यात आले. त्याआधी अधिकारी व कंत्राटी कर्मचाºयांचे वेतन मात्र वेळेवर करण्यात आले होते. ---------------यंदा दिवाळी संपुर्ण आठवडाभर होती. त्यामुळे पुर्ण आठवडाभर पीएमपीला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांºयांचे वेतन लांबल्याची माहिती पीएमपी अधिकाऱ्याने दिली. यापुर्वीही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न होण्याचे प्रकार घडले आहेत. अपेक्षित उत्पन्न न मिळणे किंवा एखाद्या खर्चामध्ये वाढ झाल्याने ही परिस्थितीत उद्भवत आहे. त्यामुळे देखभाल-दुरूस्ती, साधन-सामुग्रीच्या खर्चातही कपात करावी लागत असल्याची स्थिती आहे.------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासी