शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंना अटक केली जाते तर मग संजय राऊतांना का नाही? पुण्यात भाजप आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 16:10 IST

शिवसेना नेते संजय राऊत यांचं कोथळा बाहेर काढू वक्तव्य धमकीच...ती भाजप कदापि खपवून घेणार नाही.

पुणे : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. आम्ही समोरुन कोथळा बाहेर काढतो असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरून भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला असून संजय राऊत यांना पुण्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. तसेच भाजपकडून त्यांच्या अटकेची मागणी देखील करण्यात आली आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत हे मागील दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिरूर, खेड, जुन्नरमध्ये शिवसेनेच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं होतं तसेच भाजपवर देखील जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. काल खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला होता. आता भाजपने देखील राऊतांना गर्भित इशारा दिला आहे. 

भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. तसेच कोथळा बाहेर काढू हे त्यांचं वक्तव्य एकप्रकारे धमकीच दिल्यासारखी आहे. ती आम्ही खपवून घेणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अटक झाली होती. त्यामुळे आता राऊत यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी. जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर राज्यभरात आंदोलन करण्यात येईल असेही मुळीक यावेळी म्हणाले. 

संजय राऊत यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमत देखील नाही. ते वादग्रस्त वक्तव्य करून राजकारण करत असल्याचा आरोपही मुळीक यांनी यावेळी केला. राऊत यांचे कोथळा बाहेर काढू हे वक्तव्य आपल्या संस्कृतीला शोभणारं नाही असेही मुळीक यांनी यावेळी सांगितले. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे म्हणाले, पुणे शहर भाजपच्या वतीने संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला तक्रार अर्ज स्वीकारला असून कायदेशीर बाबींचा संदर्भ घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. 

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते... आतापर्यंत पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं तर एकच चेहरा समोर याचचा, तो कोणाचा? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारतानाच त्यावर उपस्थितांनी शरद पवार असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी आता पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले की दुसरा चेहरा ही समोर येतो, तो कोणाचा? असा प्रश्न विचारताच त्यावर उपस्थितांपैकी काहींनी उद्धव ठाकरेंचा नाव घेतले होते. त्याला चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला होता. 

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे