शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
4
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
5
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
6
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
7
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
8
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
9
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
10
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
11
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
12
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
13
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
14
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
15
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
16
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
17
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
18
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
19
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...

ऑनलाइन परीक्षा कायमस्वरूपी असल्याचा गैरसमज करून घेतला असेल तर तो साफ चुकीचा : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 05:53 IST

कोरोनामुळे ऑनलाइन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाइन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं सामंत यांचं वक्तव्य.

पुणे : “ऑनलाइन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना जास्त गुण द्यावेत, अशी भूमिका राज्य शासनाने कधीही घेतलेली नाही. कोरोनामुळे ऑनलाइन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाइन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा कायमस्वरूपी असल्याचा गैरसमज करून घेतला असेल तर तो साफ चुकीचा आहे,” असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.

शिक्षण राज्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे या शैक्षणिक वर्षाच्या सवर्व परीक्षा आॉफलाइन पद्धतीने होतील, असे दिसत आहे. तसे झाल्यास विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी कमी होतील. आॉनलाइन परीक्षा देण्यात त्यांना असंख्य आव्हानांचा सामना करावा लागत आहे. केवळ महाविद्यालयेच नव्हे, तर शाळांच्या परीक्षाही आॉफलाइन व्हाव्यात, अशी शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांची मागणी आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील कोरोना स्थितीचा विचार करून ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात, असा मार्ग सुचवण्यात आला. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून परीक्षांबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना राज्य सरकारने दिल्या आहेतण असे ते म्हणाले.

ऑनलाइन की ऑफलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयात धरसोड झाल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊ नये, त्यांची मानसिकताही लक्षात घ्यायला हवी, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यायला हवी, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी तसच यंदा विद्यार्थ्यांना आॉफलाइन पद्धतीने परीक्षा द्याव्या लागल्या आहेत. त्यामुळे ते त्रासून गेल्याचे जाणवत आहे. 

“राज्यात विद्यापीठे व महाविद्यालये सुरू झाली; परंतु अद्याप वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही वसतिगृहात राहण्यास परवानगी मिळत नाही, हे खरे असले तरी ‘ओमायक्रॉन’मुळे सध्या देशात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तर क्वारंटाईन सेंटरसाठी वसतिगृह उपलब्ध होण्यास अडचणी येतील. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला जाणार  असेही शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवले.

लेखी तक्रारीनंतरच महाविद्यालयांवर कारवाई“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी किती व कोणत्या गोष्टींसाठी शुल्क आकारावे, याचे स्पष्ट आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत; मात्र तरीही काही महाविद्यालयांकडून नियमबाह्य व बेकायदेशीर शुल्क आकारणी करून विद्यार्थ्यांची पिळवणूक व फसवणूक केली जात असेल तर संबंधित विद्यार्थी व पालकांनी तंत्र शिक्षण सहसंचालक किंवा उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी. संबंधितांवर कारवाई केली जाईल,” असेही उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. महाविद्यालये आमच्याकडून वाजवीपेक्षा अधिक रक्कम घेत आहेत, अशा तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण खात्याकडे केल्या आहेत. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतcorona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षा