शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचं हित असेल तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:20 IST

कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

पुणे : नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था या सगळ्या ठिकाणी महिलांना आरक्षण दिले. लोकांना सुरुवातीला पटलं नव्हतं, पण शेवटी लोकांनी ते मान्य केलं. कोणतेही बदल हिताचे करायचे असतात, नाराजी असते, पण समाजाचं हित असेल, तर ती नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते. लोकांची मानसिकता बदलली असं सांगता येणार नाही. स्त्री आणि पुरुष कर्तृत्वाच्या बाबतीत कुठेही कमतरता नाही. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महिला धोरणाची त्रिदशकपूर्तीनिमित्त रविवारी यशस्विनी सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे , लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, धैयकन्या आसावरी जगदाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे आदी उपस्थित होते. यशस्विनी सन्मान पुरस्कार कृषी क्षेत्रातील मनीषा सजनपवार, साहित्यक्षेत्रातील डॉ. श्यामल गरुड, उघोग क्षेत्रातील कमल कुंभार, सामाजिक क्षेत्रातील उल्का महाजन, क्रीडा प्रशिक्षक क्षेत्रातील डॉ. शबनम शेख, पत्रकारिता क्षेत्रातील अलका धुपकर यांना देण्यात आला.

शरद पवार म्हणाले, महिलांसंदर्भात देशातील पहिलं धोरण हे महाराष्ट्रात तयार केलं गेलं. पण निर्णय घेताना अनेक वेळेला कुठे ना कुठेतरी विरोध होत होता. मानसिकता बदलायची आवश्यकता होती. समाजातल्या पुरुषवर्गाची ती मानसिकता त्या काळात बदलली नव्हती. हल्ली सुद्धा तीच मानसिकता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळते. त्यातलं एक एक कलम, तरतूद याच्यासाठी तासन्तास चर्चा करावी लागली. त्याला ज्यांचा विरोध आहे त्यांना समजावून सांगावं लागलं. काही कायद्यात दुरुस्ती करावी लागली. काही लहान प्रश्नांबाबतीतसुद्धा काही पुरुषांची मानसिकता ही बदल स्वीकार करायची नसते. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध होतो. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये हा कायदा आपण केला. महिलांना अधिकार दिले ते निव्वळ या कायद्याने प्रॉपर्टीत नाही तर सत्तेमध्ये सुद्धा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये महिलांना अधिकार देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात दिला. लोकांची मानसिकता बदलली असं सांगता येणार नाही. स्त्री आणि पुरुष कर्तृत्वाच्या बाबतीत कुठेही कमतरता नाही.

कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे. संधी मिळाली तर स्त्रीसुद्धा पडेल ती जबाबदारी घेऊ शकते. साधी गोष्ट आहे जुन्या पिढीतल्या लोकांना एक प्रश्न विचारला की, १९४७ सालापासून आजपर्यंत तुम्हाला देशामध्ये प्रभावीपणे निर्णय घेणारा प्रधानमंत्री कोण वाटतो? तर त्यांच्याकडून उत्तर येईल ‘इंदिरा गांधी’. इंदिरा गांधी यांनी कर्तृत्व दाखवलं, देश चालवण्यासंबंधीची दृष्टी दाखविली. महिला हे करू शकतात, हा इतिहास त्यांनी घडविला. त्यामुळे कर्तृत्व हे दोघांच्यातही असतं असे शरद पवार यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, धैयकन्या आसावरी जगदाळे, मनीषा सजनपवार, डॉ. श्यामल गरूड, कमल कुंभार, उल्का महाजन, डॉ. शबनम शेख, अलका धुपकर यांची भाषणे झाली.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवार