ग्रामपंचायती सुधारल्यास देशाचा विकास
By Admin | Updated: August 14, 2015 03:19 IST2015-08-14T03:19:20+5:302015-08-14T03:19:20+5:30
स्वातंत्र्यापूर्वीच्या हजारो वर्षांपासून ग्रामपंचायत ही संकल्पना अस्तित्वात असल्याची नोंद ऋग्वेदातही पाहायला मिळते. स्वावलंबन, शक्तीनिश्चिता, स्वतंत्रता आणि सार्वभौमत्व हे गुण

ग्रामपंचायती सुधारल्यास देशाचा विकास
वाकड : स्वातंत्र्यापूर्वीच्या हजारो वर्षांपासून ग्रामपंचायत ही संकल्पना अस्तित्वात असल्याची नोंद ऋग्वेदातही पाहायला मिळते. स्वावलंबन, शक्तीनिश्चिता, स्वतंत्रता आणि सार्वभौमत्व हे गुण प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये हवेत. सर्व ग्रामपंचायती स्वावलंबी झाल्या, तरच देशाचा विकास साधता येईल, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी माण येथे केले.
देशातील ५ लाख ग्रामपंचायतींपैकी इतर ग्रामपंचायतींना मार्गदर्शक ठरणाऱ्या आदर्श १० ग्रामपंचायतींची केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाने २ जानेवारी २०१५ रोजी रोल मॉडेल म्हणून निवड केली. यापैकी पुण्यातील माण ग्रामपंचायतीचही निवड झाली. यासाठी खास तीनदिवसीय पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांनी गुरुवारी ग्रामपंचायतीला भेट दिली. या वेळी ते बोलत होते. या वेळी राव यांच्या हस्ते माण पॅटर्न या चित्रफितीचे व डिजिटल लॉकर या सुविधेचे उद्घाटन, तर ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण केले. ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून त्यांनी स्तुती केली.
विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव परिमल सिंग, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुळशीचे सभापती रवींद्र कंधारे, उपसभापती सविता पवळे, गटविकास अधिकारी शालिनी कडू, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कुटे, सरपंच पार्वती भरणे, उपसरपंच चंद्रकांत ठाकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शंकर मांडेकर, उपाध्यक्ष नंदकुमार भोईर, सुरेश हुलावळे, हिंजवडीचे सरपंच श्यामराव हुलावळे, माजी उपसरपंच सुनील भरणे, पांडुरंग ओझरकर, तानाजी पारखी उपस्थित होते . (वार्ताहर)