परीक्षेचा निर्णय न झाल्यास मनविसेतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST2021-03-07T04:11:46+5:302021-03-07T04:11:46+5:30
पुणे विद्यापठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या परीक्षेतील गोंधळ यापूर्वी सर्वांनी पहिला असून, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेताना अनेक चुका झाल्या. ...

परीक्षेचा निर्णय न झाल्यास मनविसेतर्फे आंदोलन
पुणे विद्यापठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या परीक्षेतील गोंधळ यापूर्वी सर्वांनी पहिला असून, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेताना अनेक चुका झाल्या. तसेच विद्यापठाने ज्या कंपनीला काम दिले त्या कंपनीने पारदर्शकतेच्या नावाखाली विद्यापीठाच्या परीक्षेत असंख्य गैरप्रकार करण्याची खुली मुभा विद्यार्थ्यांना दिली.यातून विद्यापठाची प्रतिमा मलिन झाली. हा पूर्व अनुभव असताना विद्यापीठाने परिक्षांबाबत कुठलाही निर्णय न घेणे निंदनीय आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे.
कंपनी निवड करण्यात जर इतका विलंब होत असेल तर विद्यापीठ प्रशासन खरंच विद्यार्थी हितासाठी काम करते का ? असा प्रश्न निर्माण होतो. आधीच कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असताना ही अनिश्चितता विद्यार्थ्यांची चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे विद्यापठाने तातडीने याबाबत निर्णय घेऊन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणीही यादव यांनी केली आहे.
---------------------------------------