शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोथरूडच्या सांस्कृतिक राजधानी असली तरी कागदपत्रे कसब्यात : गिरीश बापट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 09:05 IST

सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष कोथरुडमधून प्रतिनिधीत्व करत आहेत. अशावेळी बापट यांचे हे वक्तव्य जाणकारांच्या भुवया उंचावणारे ठरले हे मात्र निश्चित. 

पुणे :कोथरूड पुण्याची सांस्कृतिक राजधानी असली तरी तिची कागदपत्रे शनिवार वाडा आणि कसब्यात आहेत अशा शब्दात खासदार गिरीश बापट यांनी पुन्हा एकदा 'कसब्याचे' महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष कोथरुडमधून प्रतिनिधीत्व करत आहेत. अशावेळी बापट यांचे हे वक्तव्य जाणकारांच्या भुवया उंचावणारे ठरले हे मात्र निश्चित. 

पुणे शहराच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांच्या सर्वपक्षीय सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, शिवसेनेचे शशिकांत सुतार, काँग्रेसचे रमेश बागवे, मनसेचे किशोर शिंदे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना बापट म्हणाले की, 'सर्वपक्षीयांनी एकत्रित काम करून जनतेचे प्रश्न सोडवायला हवेत. काम झाल्यावर त्याचा फायदा कोणत्याही पक्षाला नाही तर जनतेला होत असतो. पुण्यात भेडसावणाऱ्या पाण्याच्या, वाहतुकीच्या प्रश्नांवर मोहोळ काम करतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पुणे शहराबद्दल वेगळे आगळे आकर्षण आहे. कोथरूड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र, राजधानी असली तरी तिची कागदपत्रे मात्र शनिवारवाडा आणि कसब्यात आहेत'असेही ते म्हणाले. 

  चंद्रकांत पाटील म्हणाले की,  'आगामी काळात निवडणुका जिंकता येणार नाहीत, इव्हेन्ट मॅनेजमेंटवर नेता होता येणार नाही आणि राज्यही चालवता येणार नाही. प्रत्यक्ष सामान्य माणसाला विश्वास वाटला तर निवडून येता येईल. असा विश्वास फडणवीस यांच्या बद्दल जनतेला वाटला आणि त्यामुळे वसंतराव नाईकांप्रमाणे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले. शेवटच्या दिवशी  पैसे वाटून काही होणार नाही असेही ते म्हणाले.   

टॅग्स :girish bapatगिरीष बापटDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाkothrudकोथरूडkasba-peth-acकसबा पेठ