विधानसभा स्वबळावर लढल्यास पक्षाला फायदा

By Admin | Updated: June 28, 2014 23:12 IST2014-06-28T23:12:20+5:302014-06-28T23:12:20+5:30

‘आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणो स्वबळावर निवडणुका लढविल्या तर कॉँग्रेस पक्षाचे अधिकाधिक आमदार निवडून येतील,’

If the assembly is contesting on its own, the party will benefit | विधानसभा स्वबळावर लढल्यास पक्षाला फायदा

विधानसभा स्वबळावर लढल्यास पक्षाला फायदा

>बंडगार्डन : ‘आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणो स्वबळावर निवडणुका लढविल्या तर कॉँग्रेस पक्षाचे अधिकाधिक आमदार निवडून येतील,’ असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी येथे व्यक्त केला.
मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवनमध्ये पुणो कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ कॉँग्रेस आय पक्षाच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात कदम बोलत होते. ते म्हणाले, ‘आघाडी सरकारने महाराष्ट्रात घेतलेले महत्त्वाचे निर्णय तसेच सरकारच्या योजना मतदारांर्पयत  पोहोचविल्या पाहिजेत. कार्यकत्र्याना बरोबर घेऊन शिबिरांचे आयोजन करणो गरजेचे आहे. भविष्यकाळात आपण शहर पातळीवर बैठकांचे आयोजन करणार आहोत. मोदी सरकारने केलेली रेल्वे दरवाढ त्यातून मोदी सरकारचा खरा चेहरा पुढे आला आहे. देशाच्या सामाजिक एकात्मतेला मोदी सरकारचे नेतृत्व घातक आहे. त्यासाठी कॉँग्रेसच्या कार्यकत्र्यानी जागरुक राहिले पाहिजे,’ असेही ते म्हणाले. (वार्ताहर)
 
मार्गदर्शन सत्र
4पहिल्या सत्रत ‘प्रभावशाली वक्ते कसे असावेत’ या विषयावर हाजी नदाफ, ‘कार्यकर्ता नागरिक समन्वय’ या विषयावर आमदार रमेश बागवे यांनी मार्गदर्शन केले. शिबिराच्या दुस:या सत्रत कार्यक्रमाचे नियोजन, आंदोलने आणि निदर्शने’ या विषयावर विठ्ठल थोरात यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘सोशल मीडिया-उपयोग, दुरुपयोग व आपला सहभाग’ या विषयावर रमेश अय्यर यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: If the assembly is contesting on its own, the party will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.