शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत विकासासाठी विचारगट महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

पुणे : ‘कोणत्याही देशाचे, संस्थेचे धोरण ठरवताना सर्वांगाने विचार व्हावा लागतो. त्या दृष्टीने समर्पित वृत्तीने विचार करणाऱ्या तटस्थ, तज्ज्ञ ...

पुणे : ‘कोणत्याही देशाचे, संस्थेचे धोरण ठरवताना सर्वांगाने विचार व्हावा लागतो. त्या दृष्टीने समर्पित वृत्तीने विचार करणाऱ्या तटस्थ, तज्ज्ञ मंडळींचा विचारगट काम करत असतो. शाश्वत विकासासाठी असा विचारगट अतिशय महत्त्वाचा आहे. भारतामध्ये राष्ट्रीय ते स्थानिक पातळीपर्यंत असे विचारगट स्थापन होण्याची गरज आहे. शांतता, संघर्ष आणि दहशतवाद यामध्येही विचारगटाची भूमिका महत्त्वपूर्ण राहते’, असे मत ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर यांनी व्यक्त केले.

टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशनतर्फे (टीटीए) ‘थिंक टॅंक : का आणि कसे?’ या विषयावर आयोजित व्याख्यानात संदीप वासलेकर बोलत होते. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), डेक्कन शुगर टेकनॉलॉजिस्टस असोसिएशन (डीएसटीए) आणि शुगर फॅक्टरीज फेडेरेशन (एसएफएफ) यांच्या सहयोगाने हे व्याख्यान झाले. प्रसंगी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, ‘टीटीए’चे अध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव विलास रबडे, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, अजित चौगुले उपस्थित होते.

वासलेकर म्हणाले, ‘सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्र, लष्कर, तंत्रज्ञान, पर्यावरण, पायाभूत सुविधा, पाणी, संशोधन आणि संस्कृती आदी गोष्टींच्या विकासाचे धोरण कसे असावे, हे विचारगट ठरवतो. प्रभावी विचारगटासाठी चांगले आर्थिक पाठबळ, तज्ज्ञ व्यक्तींचे योगदान, दूरदृष्टीकोन असणे गरजेचे असते. अलीकडच्या काळात विचारगटाचे महत्त्व सर्वच स्तरांवर अधोरेखित होत असून, ते विस्तारत आहे. शासकीयसह खासगी आस्थापना आणि उद्योगांमध्येही विचारगट स्थापन होत आहेत. अनुभवी, नवकल्पना असलेले ज्येष्ठ, तरुण, महिला अशा सगळ्यांमुळे विचारगट अधिक सक्षम होत आहेत.’

शेखर गायकवाड म्हणाले, ‘नवकल्पना, ज्ञान सर्वांसाठी खुले होण्याची गरज आहे. विचारगटांचे स्वतंत्र अस्तित्व व त्यांची मान्यता दूरगामी असावी. सरकार बदलाचा परिणाम विचारगटावर किंवा त्यांनी तयार केलेल्या धोरणांवर होऊ नये. त्याचबरोबर विचारगट दबावगटही होता कामा नयेत. पक्षीय विरोधामुळे सध्या अनेक चांगल्या योजना कालबाह्य होताना आपण पाहतो. त्यामुळे तटस्थ, निःपक्ष विचारगट उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत.’

श्रीपाद गंगावती यांनीही आपले विचार मांडले. विलास रबडे यांनी सूत्रसंचालन केले. अजित चौगुले यांनी आभार मानले.