डीएनएद्वारे पटणार जवानांची ओळख; ७ हजार जवानांच्या नमुण्यांचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:52 PM2018-02-07T15:52:55+5:302018-02-07T15:56:19+5:30

‘हाय रिस्क झोन’ मधील जवनांचे डीएनए प्रोफायलिंग करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेचचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Identity of the soldiers by DNA; collecting samples of 7 thousand soldiers completed | डीएनएद्वारे पटणार जवानांची ओळख; ७ हजार जवानांच्या नमुण्यांचे काम पूर्ण

डीएनएद्वारे पटणार जवानांची ओळख; ७ हजार जवानांच्या नमुण्यांचे काम पूर्ण

Next
ठळक मुद्देआर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयात अ‍ॅन्यूअल आर्म फोर्स मेडिकल कॉन्फरन्सचे आयोजनलष्करी आरोग्याविषयात अतिउच्च दर्जाच्या संशोधनात वाढ करण्याविषयी तज्ज्ञांची होणार बैठक

पुणे : एनएसजी जवान तसेच स्पेशल फोर्स कमांडो, वैमानिक तसेच पाणबुडी आणि जहाजावरील सैनिक यांना कायम अपघातात धोका असतो. बॉम्ब हल्ला, आग तसेच विमान अपघातात सैनिकांच्या मृतदेहांची ओळख पटविणे कठीण होते. यासाठी ‘हाय रिस्क झोन’ मधील जवनांचे डीएनए प्रोफायलिंग करण्याचे काम सुरू आहे. जवळपास ७ हजार जवानांचे डीएनए सँम्पलिंग जमा करण्यात आले आहे. भविष्यातही सँपलिंगचे काम सुरू राहणार असून संपूर्ण जवानांचे डीएनए जमा करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे जवानांची ओखळ पटवणे भविष्यात शक्य होणार आहे, अशी माहिती आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेचचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पुण्यातील आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयात ६६ व्या अ‍ॅन्यूअल आर्म फोर्स मेडिकल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लष्करी आरोग्याविषयात अतिउच्च दर्जाच्या संशोधनात वाढ करण्याविषयी तज्ज्ञांची बैठक होणार आहे.  याबाबत पत्रकारांना माहिती देताना लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी बोलत होते. 
पुरी म्हणाले, की नमुने गोळा करण्यासाठी १७० डॉक्टरांची टीम प्रशिक्षीत करण्यात आली आहे. पुण्यातील एएफएमसीमध्ये ते गोळा करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी झालेल्या सुखोईच्या अपघातात वैमानिकांची ओखळ पटवणे कठीण झाले होते. यावेळी त्यांच्या शरीराच्या काही अवयावरून डीएनएच्या माध्यमातून त्यांची ओळख पटविण्यात आली होती. यामुळे संपूर्ण जवानांचे डीएनए नमुने घेण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. आर्म फोर्स मेडिकल कॉलेजद्वारे ते करण्यात येत आहे. 
आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयाच्या कोर्सची क्षमता वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ही मागणी सरकारने मान्य केली असून येत्या सत्रापासून १५० मुला मुलींना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याबरोबरच त्यांना पायाभूत सुविधाही देण्यावर भर असणार आहे. यात मानव संसाधन, वसतीगृहे, शिक्षक तसेच दळणवळणाच्या सोयी आणि सुविधाही वाढवण्यात येणार आहे. यामुळे त्यांना उतिउच्च दर्जाचे शिक्षण देता येणार आहे. 
जवानांना अनेक आघाड्यांवर लढावे लागते. अति उंचावरील थंड प्रदेशात तसेच वाळवंट, समुद्र आणि हवेत प्रतिकुल परिस्थितीत त्यांना शत्रुचा सामना करावा लागतो. या स्थितीत त्यांची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. यासाठी  मिलीटरी मेडिसीन संशोधन करणे गरजेचे आहे. यासाठी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये येत्या काळात  रिसर्च विंगची स्थापना करण्यात येणार आहे. यात लष्कराच्या मेडिकल कॉलेजमधून संशोधकांची फळी निर्माण करण्यात येणार आहे. ही टीम जवानांच्या क्षमता वाढीसाठी संशोधन करणार आहे. 
गेल्या वर्षी एफमसीला जार्इंट पार्लामेंट्री हेल्थ कमिटीने भेट दिली होती. त्यांनी एएफएमसी ही स्वायत्त करण्याबाबत तसेच ही संस्था इन्स्टिट्यूट आॅफ नॅशनल इंपॉरटन्स करण्याबाबत सूचना केल्या होत्या. या बाबतचा प्रस्ताव  पाठवण्यात आला असून भविष्यात याबाबत निर्माण होईल. 

आसीयान देशांबरोबर होणार लष्करी प्रात्यक्षिके
आसीयान देशांसोबत मिलीटरी मेडिसीन बाबत सहकार्य करण्यासाठी भारत प्रयत्न शिल आहे. बाबत म्यॉनमार देशाला सहकार्य करण्यात येणार आहे. या बाबत मार्च २०१९ मध्ये लखनौ येथे सर्वात मोठे फिल्ड एक्सरसाईचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व आसीयान देश सहभागी होणार आहे. यात आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर लष्करी कवायती होणार आहे. 

पुण्यात होणार रोबोटद्वारे सर्जरी
शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेत अनेक बदल होत आहे. रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रीया करण्यात येत आहे. येत्या काळात पुण्यातील एएफएमसी, तसेच मुंबई आणि बंगळुरू येथील लष्कराच्या रूग्णालयात रोबोटद्वारे शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे उपकरणे तसेच विभागाची निर्मिती करण्यात येणार आहे.

युद्धभूमीतून जखमींना रोबोट काढणार बाहेर
युद्धभूमीत जखमी जवानांना सुरक्षित बाहेर काढणे मोठी जबाबदारी असते. जवानांना आपला जीव धोक्यात घालून जखमींना बाहेर काढावे लागते. भविष्यात जखमींना युद्धभूमितून बाहेर काढण्यासाठी रोबोटची मदत घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने डीआरडीओमध्ये असे रोबोट बनविण्याचे संशोधन सुरू असल्याची माहिती लेफ्टनंट जलरल पुरी यांनी दिली. 

अवयव प्रत्यारोपणाबाबत जनजागृती
एएफएमसीमध्ये सर्व प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रीया होत आहे. यासाठी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम हाती घेतला आहे. लष्करातील जवान तसेच सामान्य नागरिकांनी अवयव दानासाठी अर्ज केले आहे. लष्कराच्या सर्व ठिकाणी अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कमी वेळेत अवयव रूग्णाला देण्यासाठी विशेष विमान आहे. मात्र, अवयव दानाबाबत जागृती झालेली नाही. बरेचदा डोनर मिळत नसल्याने रूग्णांचा जीव वाचत नाही. अवयावासाठी प्रतिक्षेत असणा-यांची संख्या मोठी आहे.  यासाठी नॅशनल आॅरगन ट्रान्सप्लांट आॅरगनायझेशनची समन्वय साधण्यात येत आहे. याबरोबर आर्म फोर्स आॅरगन ट्रान्सप्लांट प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे गरजु जवांनांचे अवयव प्रत्यारोपण केले जात आहे. 

कमांड हॉस्पिटलचे रखडलेले काम लवकर होणार पूर्ण
पुण्यातील सर्वात मोठे असणारे कमांड हॉस्पीटलचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होणार आहे. १०८२ बेडची सुविधा असलेल्या या दवाखाण्याच्या कामाला २०१३ मध्ये मंजुरी मिळाली होती. हे काम २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. दवाखान्याच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, आतील काही कामे कंत्राटदाराने पूर्ण केली नाहीत. कामाला उशीर होत असल्यामुळे सध्या असलेल्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात नव्याने निविदा काढण्यात येणार असून राहिलेले काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 

Web Title: Identity of the soldiers by DNA; collecting samples of 7 thousand soldiers completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.