शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील सात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 20:50 IST

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये जिल्ह्यातील सात शिक्षकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमंगळवारी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील पुरस्कारांची घोषणा

पुणे : राज्य शासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये जिल्ह्यातील सात शिक्षकांचा समावेश आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तीन शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शासनाकडून दरवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. मंगळवारी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकुण १०८ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक, १८ आदिवासी प्राथमिक शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, २ विशेष शिक्षक (कला/क्रीडा), १अपंग शिक्षक, १ गाईड शिक्षक व १ स्काऊट शिक्षकांचा समावेश आह. या पुरस्कारांचे वितरण दि. ५ सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. एकुण १०८ पुरस्काराप्राप्त शिक्षकांमध्ये पुणे जिल्ह्यात सात शिक्षकांचा समावेश आहे. त्यापैकी तीन शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहेत. प्राथमिक शिक्षक पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील दोन्ही शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहेत. तसेच आदिवासी प्राथमिक शिक्षक पुरस्कारही जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनाच मिळाला आहे. कला शिक्षकांसाठीचा एकमेव पुरस्कार पुण्यातील अहिल्यादेवी हायस्कुलमधील सहायक शिक्षक मोहन देशमुख यांना जाहीर झाला आहे. प्राथमिक शिक्षक प्पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे -प्राथमिक शिक्षक - १. माधुरी वेल्हाळ (सहायक शिक्षक) - जिल्हा परिषद शाळा, रायवाडी२. बळीराम सरपणे (सहायक शिक्षक) - जिल्हा परिषद शाळा, खेडेकरवस्ती (खामगाव), ता. दौंडमाध्यमिक शाळा -१. अण्णासाहेब पाटील (सहायक शिक्षक) - श्री शिवाजी मराठा जिजामाता हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, शुक्रवार पेठ२. एकनाथ बुरसे (मुख्याध्यापक ) - हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कुल, खराळवाडी, पिंपरीआदिवासी प्राथमिक शाळा - १. उत्तम सदाकाळ (सहायक शिक्षक) - जिल्हा परिषद शाळा, करंजाळे, ता. जुन्नरकला शिक्षक -१. मोहन देशमुख (सहायक शिक्षक) - अहिल्यादेवी हायस्कुल फॉर गर्ल्स, पुणेसावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार - १. डॉ. तेजस्विनी जगताप (सहायक शिक्षक) - साधना विद्यालय व आर. आर. शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, हडपसर.-----------------------------  

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थी