पुण्यातील वारजे परिसरात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 13:15 IST2017-12-01T13:15:03+5:302017-12-01T13:15:58+5:30
वारजे गणपती माथा परिसरातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम जळून खाक झाले आहेत. रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.

पुण्यातील वारजे परिसरात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम जळून खाक
ठळक मुद्देआगीची घटना रात्री १ ते दीडदरम्यान घडल्याची माहिती आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही
पुणे : वारजे गणपती माथा परिसरातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम जळून खाक झाले आहेत. रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.
या एटीएममध्ये रात्री दहाच्या दरम्यान कॅश भरण्यात आली होती. तर आगीची घटना रात्री १ ते दीडदरम्यान घडल्याची माहिती मिळत आहे. परिसरात अग्निशामकदलाची सुविधा उपलब्ध नसल्याने थेट कोथरूडवरून अग्निशामक दलाचा बोलावण्यात आले. मात्र वेळ लागल्यामुळे आगीची तीव्रता वाढली आणि यात येथील दुकानासह एटीएम जळून खाक झाले. दरम्यान आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.