शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

'हिंदीतच बोलणार...' वाघोलीतील डी मार्टमध्ये मुजोरी, मराठीत बोलायला नकार; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 12:26 IST

महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना अजिबात दया माया दाखवू नका

पुणे - गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी विरूद्ध अमराठी असा वाद वाढताना दिसतोय. मराठी भाषेला आणि मराठी भाषकांना हक्काच्या महाराष्ट्रातच वाईट वागणूक दिली जात असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या. नुकताच यातील एक प्रकार मुंबईतील एअरटेल कंपनीच्या सर्व्हिस सेंटर गॅलरीमध्ये घडला होता तर आता पुण्यातील मराठी विरूद्ध अमराठी असा वादाचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पुण्यातील वाघोली डी मार्ट येथील असल्याची माहिती मिळत आहे. या व्हिडिओत एक माणूस मराठी बोलण्यास सांगत आहे. डी मार्टमध्ये उपस्थित असलेला दुसरा माणूस त्याला हिंदी भाषेतच बोलणार मराठी बोलणार नाही असे सांगत आहे. त्यासोबत दोघात शाब्दिक वार होतांना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर काही युजर्सनी  महाराष्ट्रात मराठी बोलायला हवी म्हणून व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला पाठींबा दिला आहे तर काही युजर्सने संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत एका युजर्सने लिहिले आहे ,'महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना अजिबात दया माया दाखवू नका. हे xxx महाराष्ट्रात येऊन आपल्याशी कितीही तोंडावर गोड बोलले तरी पाठीमागून हे ह्यांची लायकी दाखवतात. मराठी माणसा आता तरी जागा हो..' असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.

तत्पूर्वी, नुकताच एक प्रकार एअरटेल कंपनीच्या सर्व्हिस सेंटर गॅलरीमध्ये घडला. 'क्यू मराठी आना चाहिए? कहा लिखा हुआ है. हम हिंदुस्थान मैं रहते है', असे एक तरुणी मराठी तरुणाला म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एअरटेलच्या गॅलरीत तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने मराठी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तेथील तरुणीने मराठी बोलण्यास नकार देत हुज्जत घातली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत  भाजपाच्या आमदार चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी थेट वॉर्निंग दिली होती.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी